एक्स्प्लोर
बिल्डर देवेन शहा हत्या : छोटा राजनच्या हस्तकाला बेड्या
देवेन शहा (वय-53 वर्षे) यांची त्यांच्या राहत्या घरी 13 जानेवारी रोजी मध्यरात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

पुणे : पुण्यातील प्रभात रस्त्यावरील सायली अपार्टमेंटमध्ये बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची 13 जानेवारीच्या मध्यरात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक राजेश उर्फ पंडित अग्रवाल याच्या पुणे पोलिसानी मुसक्या आवळल्या. राजेश उर्फ पंडित अग्रवाल याला दिल्लीतून अटक करण्यात आली असून आज सायंकाळी पुण्यात आणण्यात आले आहे. देवेन शहा (वय-53 वर्षे) यांची त्यांच्या राहत्या घरी 13 जानेवारी रोजी मध्यरात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या झाली त्या दिवशी देवेन शहा पत्नीचा वाढदिवस साजरा करुन प्रभात रस्त्यावरील घरी परत आले होते. कुटुंबीयासोबत गप्पा मारत बसले असताना सव्वाअकराच्या सुमारास त्यांच्याकडे दोन इसम आले. सुरक्षारक्षरकाने याची माहिती देवेन यांना दिल्यानंतर ते मुलासोबत खाली आले. ते खाली येताच त्या इसमांनी त्यांना शिवागाळ करण्यास सुरवात केली आणि काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या छातीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक























