अजित पवारांवर बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले...
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संदर्भात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
पुणे : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर बोलताना भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. "संभाजी महाराजांना जे धर्मवीर मानत नाही त्यांची सुंता झाली असेल, जाऊन पाहा असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय. राजे उमाजी नाईक पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणू नका. त्यांना कोणत्याही एका धर्माशी जोडणे उचित ठरणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यभरात रान उठवले होतं. राज्यभरात यावरुन मोर्चे आणि आंदोलनं देखील झाली. सध्या या वादावर पडदा पडला आहे. परंतु, गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा हा मुद्दा उकरून काढला आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांनी त्यांच्या टीकेला उत्तर देखील दिले आहे. गोपीचंद पडळकर यांनी 2019 ला अजित पवार यांच्याविरुद्ध बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत पडळकर यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यानंतर देखील अनेक वेळा पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीकेचा सूर कायम ठेवला. परंतु, "मी डिपॉझिट जप्त झालेल्यांवर बोलत नाही, अशी खोचक टीका अनेक वेळा अजित पवार यांनी पडळकरांवर केली आहे.
पाहा काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
महत्वाच्या बातम्या
Rohit Pawar on Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांनी स्वतःच्या राजकारणाची काळजी करावी, पवार तुम्हाला कळणार नाहीत: रोहित पवार