Pune Politics: पुण्यात भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांसह ठाकरे गटाला धक्का; अनेक माजी नगरसेवकांच्या हाती 'कमळ', मुंबई पार पडला पक्षप्रवेशाचा सोहळा
Pune Politics: अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विकास दांगट, माजी नगरसेविका सायली वांजळे आणि माजी नगरसेवक बाळा धनकवडे यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. अशातच, पुण्यातील अनेक नेत्यांनी आज मुंबईत (Mumbai) पक्षप्रवेश केला आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापुसाहेब पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे . त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विकास दांगट, माजी नगरसेविका सायली वांजळे आणि माजी नगरसेवक बाळा धनकवडे यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व प्रवेश मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पार पडले आहेत.(Pune News)
पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या, अजित पवारांना भाजप मोठं खिंडार पडलं आहे. आज मुंबईत अजित पवार गटाच्या आठ माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे. यात माजी महापौरांच्या मुलासह, माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी उपमहापौरांचा ही समावेश आहे.
पिंपरी चिंचवड मधून भाजप प्रवेश केलेल नेते
1) संजोग वाघेरे - शहराध्यक्ष, ठाकरे गट
2) उषा वाघेरे - माजी स्थायी समिती अध्यक्षा, अजित पवार गट
3) प्रभाकर वाघेरे - माजी उपमहापौर, अजित पवार गट
4) प्रशांत शितोळे - माजी अध्यक्ष, स्थायी समिती - अजित पवार गट
5) नवनाथ जगताप - माजी अध्यक्ष, स्थायी समिती ( शरद पवार गट )
6) राजू मिसाळ - माजी उपमहापौर, अजित पवार गट
7) समीर मासुळकर - माजी नगरसेवक, अजित पवार गट
8) रवी लांडगे - भाजपचे माजी नगरसेवक ( सध्या ठाकरे गट )
9) जालिंदर शिंदे - माजी नगरसेवक, अजित पवार गट
10) अमित गावडे - माजी नगरसेवक, ठाकरे गट
11) संजय काटे - माजी अपक्ष नगरसेवक, महायुतीचे कार्यकर्ते
12) मीनल यादव - माजी नगरसेविका, ठाकरे गट
13) कुशाग्र कदम - मुलगा, माजी महापौर मंगला कदम
14) प्रसाद शेट्टी - माजी नगरसेवक, अजित पवार गट
15) विनोद नढे - माजी नगरसेवक, अजित पवार गट
मुंबईत भाजपमध्ये पिंपरी चिंचवड मधुन मोठं इनकमिंग, पिंपरीत भाजपच्या इच्छुकांचे आंदोलन
मुंबईत पिंपरी चिंचवडमधून भाजपमध्ये मोठं इनकमिंग सुरु आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवड भाजपमधील इच्छुकांनी आंदोलन सुरु केलं आहे. या इच्छुकांनी थेट बंडाचा इशारा दिला आहे. हे प्रवेश म्हणजे आम्हा निष्ठवंतांवर अन्याय करणारे आहेत. आमची फसवणूक होतीये, असं करायचं होतं तर मग 820 जणांचे अर्ज मागवून मुलाखती कशाला घ्यायच्या? अशी खदखद व्यक्त करत या इनकमिंगला इच्छुकांचा विरोध आहे. मात्र हा विरोध झुगारून भाजपने प्रवेश करुन घेतलेत. आता यांना तिकीट दिलं तर आम्ही बंड करणार, असा इशारा या इच्छुकांनी दिला आहे.
सुरेंद्र पठारेंच्या प्रवेशाने नेत्यांच्या भुवया उंचावल्या
विधानसभेला भाजपमध्ये असणारे बापू पठारे यांनी उमेदवारी मागितली होती. महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने पठारे यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत विधानसभा लढवली आणि ते विजयी झाले होते. पठारे पिता-पुत्रांनी त्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेऊन भाजपचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पठारे कुटुंबाची भाजपशी जवळीक कायम होती. त्यानुसार सुरेंद्र पठारे यांनी भाजपची आपली जुनी नाळ अधिक घट्ट करीत प्रवेशाचा मार्ग स्वीकारल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार सुरेंद्र यांचा प्रवेश होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
📍 LIVE ! पक्षप्रवेश - २० डिसेंबर २०२५ - महाराष्ट्र प्रदेश कार्यालय - पिंपरी चिंचवड!!! https://t.co/rDIjn6Mrfy
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 20, 2025























