Bhide Bridge Closed: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; भिडे पूल वाहतुकीसाठी तब्बल दीड महिना राहणार बंद, काय आहे कारण?
Bhide Bridge Closed: पुण्यातील नारायण पेठ, सदाशिव पेठ या भागातून तसेच उपनगरातून आजारांच्या संख्येने वाहन याच भिडे पुलावरून दररोज ये-जा करतात

पुणे: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी पुढील दीड महिने बंद (Bhide Bridge Closed) राहणार आहे. पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना या मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेला पादचारी पुलाचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक पुढील दीड महिने पूर्णपणे बंद (Bhide Bridge Closed) करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे भिडे पूल बंद झाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मत्र मोठी गैरसोय होताना दिसते आहे. पुण्यातील नारायण पेठ, सदाशिव पेठ या भागातून तसेच उपनगरातून आजारांच्या संख्येने वाहन याच भिडे पुलावरून दररोज ये-जा करतात, त्यामुळे वाहतूक शाखेला हा पूल बंद केल्यानंतर पर्यायी मार्ग देण्याचं मोठं आवाहन उभे ठाकले आहे.(Bhide Bridge Closed)
पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम सुरू असल्याच्या कारणास्तव भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तब्बल दीड महिना पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुणेकरांची गैरसोय न व्हावी यासाठी वाहतूक विभाग पर्यायी मार्ग खुले करणार आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भिडे पुलावर दररोज हजारो गाड्यांची ये-जा होत राहते. भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्यामुळे पुणेकरांची चांगलीच गैरसोय होत असल्याचं चित्र आहे.
बाबा भिडे पूल हा पुण्यातील मध्यवर्ती भागातील मुठा नदीवर वसलेला आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होते. नारायण पेठ, सदाशिव पेठ असे शहरातील प्रमुख भाग तसेच जे एम आणि एफसी रोड या ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. दुसऱ्या बाजूला उपनगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नदीपात्रातील रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. परंतु आता हा भिडे पूल बंद केल्यामुळे नदीपात्रातील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. मेट्रोच्या कामामुळे आपण दीड महिना बंद राहत असल्यामुळे मेट्रो प्रशासनाकडून क्षमस्व अशी पाटी या ठिकाणी लावण्यात आली आहे. पण रहदारीचा हा संपूर्ण भाग असल्यामुळे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेवर इथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
























