(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sinhagad Fort: सिंहगडावर फिरण्यासाठी जाताय? जरा जपून, गड परिसरात दरडी कोसळल्याच्या घटना, प्रशासनाने दिल्या ‘या’ सूचना
Sinhagad Fort: पावसामुळे गड किल्ले परिसरात दरडी कोसळल्याच्या घटना घडत आहेत, अशा परिस्थितीत पर्यटक आणि गिर्यारोहकांनी पायवाटेने जाणे टाळावे असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
पुणे: पुण्यासह शहर परिसरात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहर परिसरात असलेल्या गड किल्ल्यांवर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची आणि गिर्यारोहकांची संख्या वाढली आहे. मात्र, पावसामुळे गड किल्ले परिसरात दरडी कोसळल्याच्या घटना घडत आहेत, अशा परिस्थितीत पर्यटक आणि गिर्यारोहकांनी पायवाटेने जाणे टाळावे असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे. सिंहगडाच्या (Sinhagad Fort) पायवाटेवर आज पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. अशातच आज रविवार असल्याने गडावर पायी आणि वाहनाने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
सिंहगडावर जाणाऱ्या पाय वाटेवर अतकरवाडी जवळ संततधार पावसामुळे आज(रविवारी) पहाटे दरड कोसळली आहे .त्यामुळे पर्यटक आणि गिर्यारोहकांनी सिंहगडाच्या पायवाटेने जाणे टाळावे असे वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून सिंहगड परिसरात (Sinhagad Fort) चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पाय वाट असलेल्या भागात दरडी कोसळत (Landslide on Sinhgad) आहेत. पायवाटांवरून जाताना अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पर्यटकांनी फिरायला जाताना जरा जपूनच जावे, काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंहगडासह पुणे परिसरातील गड किल्ल्यांवर(Sinhagad Fort) पर्यटनासाठी जाताना सावधगिरी बाळगावी. सिंहगडावरील काही ठिकाणी निसरड्या वाटाही असल्याने पर्यटन धोक्याचे बनले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पाऊलवाटेवर दरड कोसळत आहेत. दरडप्रवण क्षेत्रात पर्यटकांनी सावधगिरीने पर्यटन करावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
पाणी मुरल्याने कोसळते दरड, पर्यटकांनी काळजी घ्यावी
सिंहगडावर(Sinhagad Fort) जाणाऱ्या पायवाटेवर दरड कोसळली. पावसाचे पाणी मुरल्यामुळे दरड कोसळते त्यामुळे दगडांवर बसणे, त्यांना पकडून चालणे टाळावे त्याचबरोबर पर्यटकांनी पायवाटेने जाताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
गडावर पर्यटकांची वर्दळ वाढली
पावसाळा सुरू झाल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर सिंहगडावर(Sinhagad Fort) फिरायला जातात. शनिवारी आणि रविवारी गडावर मोठी गर्दी दिसून येते. अगदी पहाटेपासून पर्यटक आणि गिर्यारोहक सिंहगडावर जातात.
पुणे शहर परिसरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाची हजेरी
पुणे शहर परिसरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील घाटमाथा परिसरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. पुण्यात(Pune Rain) पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मॉन्सून सक्रिय झाल्याने पुणे(Pune Rain) जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. आज (रविवारी) पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज दिवसभरात काही काळ पावसाने विश्रांती घेतली असल्याचं चित्र दिसून येत आहे