एक्स्प्लोर

Baramti Loksabha : विजय शिवतारे डोकदुखी कमी करत नसताना आता हर्षवर्धन पाटलांनी बारामतीमध्ये टेन्शन वाढवलं!

विजय शिवतारे  (Vijay Shivtare) डोकदुखी कमी करत नसताना आता हर्षवर्धन पाटलांनी  बारामतीमध्ये टेन्शन वाढवलं आहे. बारामतीत महायुतीच्या उमेदवारांवरुन वादावादी सुरु आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षाची समन्वयक बैठक बोलावण्यात आलेले आहे.

बारामती, पुणे : राज्यात बारामती लोकसभा (Baramti Loksabha Constituency)  मतदार संघाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. विजय शिवतारे  (Vijay Shivtare) डोकदुखी कमी करत नसताना आता हर्षवर्धन पाटलांनी (harshawardhan patil) बारामतीमध्ये टेन्शन वाढवलं आहे. बारामतीत महायुतीच्या उमेदवारांवरुन वादावादी सुरु आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील वाद समोर आल्यानंतर महायुतीच्या घटक पक्षाची समन्वयक बैठक बोलावण्यात आलेले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बारामतीतील कवी मोरोपंत सभागृहात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महायुतीच्या घटक पक्षातील नेते उपस्थित असतील. परंतु या घटक पक्षाच्या बैठकीला विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार नसल्याने चर्चना उधाण आले आहे. 

काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी मित्र पक्षाची लोक धमकी देतात, दमदाटी करतात सोबतच अर्बट बोलत असल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर महायुतीत नेमकं चाललंय काय? अशी चर्चा रंगली. हर्षवर्धन पाटलांनी पत्रातून आरोप केले होतेच मात्र त्यांची मुलगी अंकिता पाटीलनेदेखील अजित पवारांवर आरोप केले होते. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर मात्र महायुतीचं टेन्शन वाढलं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत समन्वयक बैठकीचा आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या बैठकीला हर्षवर्धनपाटील उपस्थित नसणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या घरात लग्नसोहळा असल्याने ते उपस्थित राहू शकणार नाही आहे. 

त्यासोबतच माजी मंत्री विजय शिवतारेंनी दोन दिवसांपूर्वी अजित पवारांविरोधात बारामती लोकसभा मतदार संघावर शड्डू ठोकला आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याच्या दाट शक्यता असल्याचं बोललं जात होतं. त्यासोबतचमी बारामतीतून लढणार असल्याचं ठामपणे सांगितलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बैठकीसाठी बोलवलं होतं. त्यानंतर दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर पुण्यातील रुग्णालयात मंत्री दीपक केसरकर आणि खासदार राहूल शेवाळेंनी शिवतारेंची भेट घेतली होती. त्यानंतर शिवतारेंनी आपला निर्णय अद्याप मागे घेतला नाही आहे. मात्र समन्वय समितिच्या बैठकीला ते उपस्थित राहणार नाही आहे. 

महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं, असा महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यासोबतच बैठकीत देखीलयावरच चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आता दोन्ही नेते कोणता  निर्णय घेतात, हे पाहणं महत्यावचं ठरणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

मोठी बातमी : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटणार?; मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस, पवार आज दिल्लीत

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

VK Singh On Ajit Pawar Plane Crash: सीआयडीच्या चौकशीत VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब; अजितदादांच्या अपघातावर काय म्हणाले?
सीआयडीच्या चौकशीत VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब; अजितदादांच्या अपघातावर काय म्हणाले?
Baramati Accident News: काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
Pune Porsche Accident : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर
Pune Gas Cylinder : गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget