एक्स्प्लोर
सुप्रिया सुळेंकडून जेजुरीगडावर 40 किलोंचा खंडा उचलण्याचा प्रयत्न
महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत अशी ख्याती असलेल्या जेजुरीगडावरील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी सुप्रिया सुळे गेल्या होत्या.

बारामती : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कृतीतून महिला या अबला नाही, तर सबला असल्याचं दाखवून दिलं आहे. जेजुरी गडावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खंडेरायाची 40 किलो वजनाची तलवार उचलण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे कुलदैवत अशी ख्याती असलेल्या जेजुरीगडावरील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी सुप्रिया सुळे काल गेल्या होत्या. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्या गडावर गेल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया यांनी चक्क 40 किलो वजनाचा खंडा (तलवार) उचलून सर्वांना चकित केलं. हा खंडा सरदार पानसे यांनी देवाला वाहिला आहे. खंडा उचलण्याचा प्रयत्न करुन आजच्या महिला सक्षम असल्याचं त्यांनी एकप्रकारे दाखवून दिलं. महाशिवरात्रीला गडावरील दोन्ही शिवलिंग दर्शनासाठी खुले असतात. यावेळी सुप्रिया सुळेंनी भविकांबरोबर सेल्फीही घेतले. 'महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्य मंदिरातील तळघरात असलेले गुप्त शिवलिंग तसेच कळसावरील शिवलिंगाचे दर्शन घेता येते. ही पर्वणी साधण्यासाठी राज्यभरातून भाविक जेजुरीला आले आहेत. येळकोट येळकोट जय मल्हार!' असं ट्विटरवर फोटो शेअर करताना सुप्रिया सुळेंनी लिहिलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























