Baramati School : बारामतीतील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत बाई नाचवली? विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, गावच्या परंपरेप्रमाणे...
Rayat Shikshan Sanstha Baramati : मोरगावमध्ये ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेची मोठी परंपरा आहे. या यात्रेच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

पुणे : बारामतीमधील रयत शिक्षण संस्थेच्या एका शाळेच्या पटांगणातील लावणीच्या कार्यक्रमातील एका तरुणीच्या अश्लील हावभावाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेवरही टीकेचा भडीमार होत असल्याचं दिसून येतंय. त्यानंतर आता ज्या शाळेत हा कार्यक्रम पार पडला त्या मोरगावच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मोरगावचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त हा कार्यक्रमा यात्रा कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. मे महिन्याच्या सुटीत झालेल्या या कार्यक्रमाचा आणि शाळा किंवा व्यवस्थापनाचा काहीही संबंध नसल्याचं मुख्याध्यापक अर्जुन कोकरे यांनी स्पष्ट केलं.
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मनोरंजन कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ कार्यक्रम झाल्यानंतर तीन महिन्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात एक तरुणी अश्लील हावभाव करत लावणी सादर करताना दिसत आहे.
*'पाव्हणं नाद करायचा नाही', तरुणीचा आक्षेपार्ह डान्स व्हिडीओ नेमका कुठला? आणि कधीचा? सत्य समोर* pic.twitter.com/lVfVBSsy9N
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) August 18, 2025
Rayat Shikshan Sanstha Baramati Video : शाळेचा काहीही संबंध नाही
या संदर्भात विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, गाव परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून विद्यालयाच्या प्रांगणात ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात. व्हायरल होणारा व्हिडीओ हा त्याच कार्यक्रमाचा असून त्याचा आणि शाळेचा कोणताही संबंध नाही.
Baramati Girl Dance Viral Video : मे महिन्यात कार्यक्रमाचे आयोजन
सालाबादप्रमाणे यावर्षीही मोरगाव ग्रामस्थांचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन 6, 7, 8 मे 2025 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात केले होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्याने विद्यालय बंद होते. त्यामुळे यात्रा कमिटी ग्रामस्थ मोरगाव यांच्या विनंती आणि मागणीवरून तोंडी परवानगी दिली गेली होती. या उत्सवात विद्यालय आणि विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी कसलाही सहभाग घेतला नव्हता असे स्पष्टीकरण विद्यालयाकडून सांगण्यात आले आहे
रयत शिक्षण संस्था ही राज्यातली एक नावाजलेली संस्था असून त्या अंतर्गत बारामती तालुक्यात मोरगावमध्ये मयुरेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आहे. मोरगाव ग्रामपंचायतीकडे सार्वजनिक कार्यक्रमासाठी कोणतेही मोठे मैदान नाही. त्यामुळे ग्रामपंचायत वा गावातील प्रमुख कार्यक्रम हे याच शाळेच्या पटांगणात होतात.
ही बातमी वाचा:























