एक्स्प्लोर

धक्कादायक! बारामतीत विवाहितेचा छळ, हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारले

बारामती तालुक्यात (Baramati Taluka) विवाहितेला हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पुणे : हुंड्यासाठी (Dowry) सासरच्या लोकांकडून छळ होण्याच्या अनेक घटना समोर येतात. त्यामुळे अनेक मुलींना त्यांचं आयुष्य देखील गमवावं लागतं. यासाठी कठोर नियम असले तरीही अनेक मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जातो. बारामती तालुक्यात (Baramati Taluka) विवाहितेला हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  या घटनेवरुन सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. बारामती (Baramati)  तालुक्यातील मासाळवाडी येथील चौघाविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती, सासू, नणंद व नंणदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

सुरेखा भाऊसाहेब गडदरे अस मयत महिलेचे नाव आहे. लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्यानं सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते, असा आरोप आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासु ठकुबाई महादेव गडदरे नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघां विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील गिरिम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली . 

आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मृत मुलीच्या कुटुंबाची मागणी 

24 डिसेंबर रोजी मासाळवाडीच्या भगवान गडदरे यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांची विवाहित मुलगी सुरेखा भाऊसाहेब गडदरे हिचा मृतदेह आढळून आला. वरील चौघा आरोपींनी तिच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये सुरेखा हिचे दोन्ही हात बांधून तिला शेततळ्यात बुडवून मारले अशी फिर्याद तिचे वडील करगळ यांनी पोलिसांकडे दिली त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.इतक्या क्रूरपणे हुंड्यासाठी सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मृत मुलीच्या कुटुंबाची मागणी आहे.

हुंडा घेणं आणि देणं दोन्हीही कायद्याने गुन्हा

भारतात हुंडा घेणं आणि देणं दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे. पण तरी आजही भारताच्या अनेक भागामध्ये हुंडा परंपरा अजूनही सुरु आहे. यामुळे अनेक तरुणींनी आपलं आयुष्य देखील गमावलं आहे. तरीही या परंपरेला खतपाणी अनेकांकडून दिलं जात. संगितासारख्या कितीतरी मुलींनी आजपर्यंत हुंड्यासाठी आपलं आयुष्य गमावलं असल्याच्या घटना भारतात घडल्या आहेत. कायाद्यानुसार जरी यासाठी कठोर नियम असले तरीही यावर पूर्णपणे आळा घालण्यात आला नाही. 

हे ही वाचा :

पप्पा, हुंड्यासाठी मारहाण होतेय...वडिलांशी बोलून मुलीने घेतला गळफास; बीडमधील दुर्देवी घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sambhaji Nagar LIVE Accident : रील काढताना अपघात, Accelerator दाबला अन् कार थेट दरीतMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा, मुंबई सुपरफास्ट ABP Majha 17 June 2024ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 17 June 2024Ravindra Dhangekar Vidhansabha : पक्ष जो आदेश देईल ते काम करणार, रवींद्र धंगेकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी
आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी
Embed widget