![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Baramati Lok Sabha Election : एक बारामती, दोन राष्ट्रवादी, दोन चिन्ह आणि दोन पवारांच्या तोफा धडाडणार
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज प्रचारासाठीचा शेवटचा दिवस असल्याने अजित पवार आणि शरद पवारांच्या शेवटच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.
![Baramati Lok Sabha Election : एक बारामती, दोन राष्ट्रवादी, दोन चिन्ह आणि दोन पवारांच्या तोफा धडाडणार Baramati Lok Sabha Election sharad Pawar and Ajit Pawar Arrange Last sabha in baramati and Indapur for sunetra pawar and supriya sule Baramati Lok Sabha Election : एक बारामती, दोन राष्ट्रवादी, दोन चिन्ह आणि दोन पवारांच्या तोफा धडाडणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/aa250512edbe1bb1011e24f3df84eb731714893441163442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बारामती, पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ (baramati Loksabhe Election 2024) यंदा चांगलाच चर्चेत राहिला आहे. येत्या 7 मेला बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. आज प्रचारासाठीचा शेवटचा दिवस असल्याने अजित पवार आणि शरद पवारांच्या शेवटच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे (Supriya sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी बारामतीत थेट लढत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे यंदा बारामतीचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी फुटल्यामुळे यंदा बारामतीत दोन्ही पवारांच्या जोरदार सभा होणार आहेत. बारामतीत यंदा दोन राष्ट्रवादी, दोन सभा आणि दोन पवार, असं चित्र पाहायला मिळत आहे.
बारामती हा पवारांचा बालोकिल्ला आहे. त्यामुळे यापूर्वी शरद पवार प्रचार सभा किंवा बाकी कोपरा सभा न घेता थेट शेवटची सभा घ्यायचे आणि त्यांच्या सभेने प्रचाराची सांगता व्हायची. ही शरद पवारांची आतापर्यंतची परंपरा होती. मात्र यंदा अजित पवारांनी घेतलेल्या वेगळ्या निर्णयामुळे शरद पवारांना अनेक सभा घ्यावा लागल्या. त्यांना महाराष्ट्रभर फिरावं लागलं आणि पुन्हा ते बाकी मतदार संघासाठीदेखील दौरा करणार आहेत. त्यात शरद पवारांना तुतारी चिन्ह मिळाल्यामुळे हे चिन्ह पोहचवण्यासाठी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीने प्रयत्न केला. आता सुप्रिया सुळेंसाठी ते सभा घेणार आहे. बारामतीकरांना ते भावनिक साद घालतात की रोखठोक भाषण करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
त्यासोबतच अजित पवारांनीदेखील सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली आहे. मात्र अजित पवारांनी पूर्ण तयारीने या सभेचं आयोजन केलं आहे. ज्या मैदानावर शरद पवार एवढे वर्ष सभा घेत होते. तेच मैदान साधारण महिन्याभरापूर्वी शेवटच्या सभेसाठी बुक केलं आणि आज त्याच मैदानावर अजित पवारांची तोफ धडाडणार आहे. अजित पवार आणि सुनेत्रा पवार मिळून ही सभा घेणार असल्याने आणि शरद पवारांना सोडून निवडणूकीसाठी अशी शेवटची सभा बारामतीत पहिल्यांदाच होणार असल्याने याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे अजित पवार दोघेही या सभांमध्ये काय बोलणार?, बारामतीकरांसमोर मतदानाच्या आवाहनासोबतच भावनिक साद घालणार की हक्काने मतं मागणार,हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)