एक्स्प्लोर

Pune Rikshaw news: पुण्यात रिक्षा चालक-मालक संघटनांचं आंदोलन; संपातील गुन्हे मागे घेण्याची मागणी

Pune Rikshaw news : ऑटो रिक्षा बंद दरम्यान रिक्षाचालकावर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या रिक्षा पंचायत समितीचे निदर्शनं केली आहेत.

Pune Rikshaw news :  पुण्यातील रिक्षा चालकांना (Pune) चक्का जाम आंदोलन (rikshaw strike) चांगलच भोवलं होतं. आंदोलनात सहभागी असलेल्या 37 रिक्षाचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. ऑटो रिक्षा बंद दरम्यान रिक्षाचालकावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या रिक्षा पंचायत समितीने निदर्शनं केली आहेत. कष्ट करणाऱ्या लोकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. हे गुन्हे मागे घेतले नाहीतर आम्हाला सत्याग्रह करून आंदोलन करावं लागेल, असा इशारादेखील बाबा आढाव यांनी दिला आहे. 

आज (19 डिसेंबर) सकाळी बाबा आढाव यांनी आणि रिक्षा पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत आंदोलन केलं, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदेखील दिलं. रिक्षाचालकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे बेकायदेशीर आहेत. हातावर पोट असणाऱ्या सगळ्या रिक्षाचालकांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी बाबा आढाव यांनी केली आहे. 


रिक्षा पंचायत समिती सत्याग्रहाच्या मार्गाने महाराष्ट्रभर आंदोलन करेल
ओला, उबेर आणि रॅपिडो यांच्यामुळे रिक्षाचालकांचं मोठं नुकसान होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक आता ओला, उबेर आणि रॅपिडोचा वापर करायला लागल्याने रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी ओला, उबेर आणि रॅपिडो बंद करा अशी मागणी मागील काही दिवसांपासून लावून धरली आहे. रिक्षा चालकांच्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र रॅपिडो अजूनही सुरुच आहे. त्यामुळे रिक्षा चालकांनी चक्का जाम आंदोलन पुकारलं होतं. याच वेळी त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेतले नाही तर रिक्षा पंचायत समिती सत्याग्रहाच्या मार्गाने महाराष्ट्रभर आंदोलन करेल, असा इशारा बाबा आढाव यांनी दिला आहे. 

रिक्षा चालकांना आंदोलन भोवल...
सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी रिक्षाचालकांविरोधात गुन्हे दाखल केले होते. पुण्यातल्या रिक्षाचालकांविरोधात गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्यासह 37 जणांना अटक करण्यात आली होती. पुण्यातल्या रिक्षाचालकांना पोलिसांनी आंदोलन करू नका म्हणून कलम 149 नुसार नोटीस बजावली होती. पण त्यानंतरही दहा रिक्षा संघटनांनी आधी पुण्यातल्या आरटीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर रिक्षाचालकांनी रस्त्याच्या मधोमध रिक्षा लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. अखेर पोलिसांनीच स्वत: त्या रिक्षा बाजूला करून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget