एक्स्प्लोर

लेखक उत्तम तुपे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाखांची मदत

उत्तम बंडू तुपे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहेच पण उतारवयातील पॅरालिसिसमुळे त्यांची प्रकृतीही ढासळली आहे. त्यांच्या पत्नीलाही पक्षघात झाल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखीच भर पडली आहे. हे पैसे आम्हा दोघा नवरा-बायकोच्या आजारपणासाठी वापरणार असल्याचं उत्तम बंडू तुपे यांनी यावेळी सांगितलं.

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांच्या बिकट यांच्या हलाखीची परिस्थिती 'एबीपी माझा'ने जगासमोर आणल्यानंतर त्यांना आता मदतीचा ओघ सुरु झाला होता. राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी काल (17 जानेवारी) पुण्यातील त्यांच्या घरी भेट देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाखांची मदत केली. त्यांना पाच लाख रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला. उत्तम बंडू तुपे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहेच पण उतारवयातील पॅरालिसिसमुळे त्यांची प्रकृतीही ढासळली आहे. त्यांच्या पत्नीलाही पक्षघात झाल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखीच भर पडली आहे. हे पैसे आम्हा दोघा नवरा-बायकोच्या आजारपणासाठी वापरणार असल्याचं उत्तम बंडू तुपे यांनी यावेळी सांगितलं. 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर तुपे यांच्या मदतीसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. त्याआधी मातंग समाजातर्फे उत्तम बंडू तुपे यांना एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्यांच्याकडे एका लाखांचा देण्यात आला आहे. या मदतीमुळे तुपे यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील अशी अपेक्षा आहे. साहित्य अकादमीपासून अनेक पुरस्करांचे मानकरी ठरलेल्या उत्तम तुपे यांची राज्य सरकाराने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणून देखील निवड केली आहे. मात्र त्यांच्या हलाखीच्या परिस्थतीकडे मात्र कोणाचं लक्ष नाही. समाजातील जळजळीत वास्तव, अनुभवांची दाहकता आयुष्यभर लेखणीवाटे साहित्यात उतरवणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांना उतारवयात मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. घरातील साहित्य कमी आणि त्यांनी लिहलेल्या साहित्यामुळे मिळालेल्या पुरस्कार आणि पदकांची संख्याच जास्त आहे. हे पुरस्कार नीट ठेवायलाही त्यांच्याकडे पुरेशी जागा नाही. लेखक उत्तम तुपे यांना मातंग समाजातर्फे एक लाखांची मदत आयुष्यभर सरकारी कार्यालयात शिपाई म्हणून काम करताना तुपेंनी लिहलेलं साहित्य त्यांना मान सन्मान तर भरपूर देऊन गेलं. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती मात्र काही बदलली नाही. त्यांनी लिहलेल्या पुस्तकांवरील रॉयल्टीही त्यांना प्रकाशकांकडून मिळत नसल्याचं ते सांगतात. उत्तम बंडू तुपे यांची साहित्य संपत्ती कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती ही त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांपैकी काही नावं. झुलवा ही जोगतिणींच्या आयुष्यावरील कांदबरी लिहिण्यासाठी ते स्वतः वेष बदलून जोगतीण बनले आणि जोगतिणींच्या वाट्याला येणारे अनुभव त्यांनी कागदावर उतरवले. भस्म या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा तर काट्यावरची पोटं या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचा साहित्य सर्वोत्कृष्ट आत्मचरित्रासाठीचा पुरस्कारही मिळाला आहे. पण आज यापैकी एकही पुस्तक त्यांच्याकडे दाखवायला देखील नाही. तिसरीपर्यंत शिकलेल्या तुपेंनी लिहलेली पुस्तके विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडली गेली. ती आठवून आजही जुने विद्यार्थी त्यांना भेटायला येतात. पाहा स्पेशल रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Tukaram Mundhe Marathi News: मी माझ्या मुलांना आयएएस न होण्याचा सल्ला देईन; तुकाराम मुंढेंचं उत्तर ऐकून अनेकांना धक्का, नेमकं काय म्हणाले?
मी माझ्या मुलांना आयएएस न होण्याचा सल्ला देईन; तुकाराम मुंढेंचं उत्तर ऐकून अनेकांना धक्का, नेमकं काय म्हणाले?
Tukaram Mundhe : 7 सेकंदांच्या स्क्रोलिंगमध्ये अडकलेल्या तरुणाईला तुकाराम मुंढेंचा तिखट सल्ला; यशासाठी दिला 'हा' मास्टर प्लॅन!
7 सेकंदांच्या स्क्रोलिंगमध्ये अडकलेल्या तरुणाईला तुकाराम मुंढेंचा तिखट सल्ला; यशासाठी दिला 'हा' मास्टर प्लॅन!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Embed widget