एक्स्प्लोर

Ankita Patil : माझ्या वडिलांचा एकेरी उल्लेख केला तर, मलाही ठाकरी शैलीत उत्तर देता येतं, अंकिता पाटील कडाडल्या

Ankita Patil, Baramati : "आम्ही जरा यंग जनरेशनमधील आहोत. आम्हाला अन्यायाची भाषा सहन होत नाही. आम्हाला क्लॅरिटीची सवय असते. आम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमधील सर्व गोष्टी लक्षात येतात. जे तालुकाध्यक्ष आहेत आणि लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती बसतात.

Ankita Patil, Baramati : "आम्ही जरा यंग जनरेशनमधील आहोत. आम्हाला अन्यायाची भाषा सहन होत नाही. आम्हाला क्लॅरिटीची सवय असते. आम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमधील सर्व गोष्टी लक्षात येतात. जे तालुकाध्यक्ष आहेत आणि लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती बसतात. ते जर माझ्या वडिलांबाबत असे शब्द वापरत असतील आणि माझ्या वडिलांबाबत जर एकेरी शब्द वापरले. तर मी पण त्यांना चांगल्या ठाकरी शैलीमध्ये उत्तर देऊ शकते. हे त्यांनी लक्षात ठेवावं", असं भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil)  यांच्या कन्या अंकिता पाटील (Ankita Patil) म्हणाल्या. त्या बारामती येथील एका सभेत बोलत होत्या. 

हर्षवर्धन पाटलांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून मित्रपक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. शिंदेंना लिहिलेल्या पत्रात हर्षवर्धन पाटील म्हणाले,  इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे, असं पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे. 

पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर सभा आणि मेळावे घेत आहेत. या सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, असं पाटील यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

अजित पवारांनाही अंकिता पाटलांनी दिला होता इशारा 

काही दिवसांपूर्वी अंकिता पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला होता. त्याची जोरदार चर्चा झाली होती. सध्या आम्ही महायुतीत आहेत. महाविकास आघाडीमध्ये होतो तेव्हा अजित पवारांनी तीन वेळेस शब्द दिला आणि नंतर पलटला. त्यामुळे तुम्ही आमचं विधानसभेला काम केलं तरच आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू, असा इशाराच अंकिता पाटील यांनी अजित पवारांना दिला आहे. 

Ankita Patil Speech : अंकिता पाटील यांचे बारामती येथील भाषण 

इतर महत्वाच्या बातम्या

Baramati : अजितदादांनी तीनवेळा शब्द देऊन पाठीत खंजीर खुपसला, आता विधानसभेला आमचं काम केलं तरच लोकसभेला मदत करू; अंकिता पाटलांचा थेट इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget