एक्स्प्लोर

TET Exam Scam : टीईटी प्रकरणी अटकेतील आयएएस सुशील खोडवेकरांचं बीड कनेक्शन

TET Exam Scam : टीईटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आयएएस सुशील खोडवेकरांचं बीड कनेक्शन समोर आलं आहे. जाणून घ्या कोण आहेत सुशील खोडवेकर?

TET Exam Scam : सुरुवातीला आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणांमध्ये बीड जिल्ह्यातील बडे मासे पोलिसांच्या गळाला लागले होते. आता तर आयएस अधिकारी असलेल्या सुशील खोडवेकर (Sushil Khodwekar) यांना अटक केल्यानंतर पुन्हा एकदा पेपरफुटी प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर आलं आहेत. सुशील खोडवेकर यांचे मूळ गाव हे बीडच्या परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव हे आहे. 

टीईटी प्रकरणामध्ये अटक असलेले परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या संपर्कात असलेले सुशील खोडवेकर यांना काल पुणे सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुशील खोडवेकर हे 2011 अधिकारी तथा कृषी विभागात प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. 

पूर्वी शिक्षण विभागात आस्थापनांमध्ये उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांनी तुकाराम सुपे यांना खात्यांतर्गत चौकशीमध्ये निर्दोष सोडले होते आणि जीए सॉफ्टवेअर या कंपनीस काळ्या यादीतून बाहेर काढण्याचा प्रताप केला. असं तपासात पुढे आलं आहे. विशेष म्हणजे, या बदल्यात जीए सॉफ्टवेअरच्या अभिषेक सावरीकर यांच्याकडून खोडवेकरांनी पैसे घेतले, शिवाय तुकाराम सुपे यांच्या संपर्कात राहून अनेक मुलांना टीईटीमध्ये पास केल्याचं सुद्धा आता पुढे येत आहे.

टीईटी परीक्षा 2019-20 या बनावट वेबसाईटवर निकाल प्रसिद्ध करून जवळपास साडेपाचशे ते सहाशे अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचा आरोप सुरुवातीला होता. मात्र पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये तब्बल 7800 जणांना पैसे घेऊन पास केल्याचं उघड झालं आहे.

टीईटीच्या घोटाळ्यामध्ये आतापर्यंत तुकाराम सुपेंनंतर जे सॉफ्टवेअर कंपनीचा मालक अश्विनकुमार. त्यासोबतच प्रीतिष देशमुख, अभिषेक सावरीकर, संतोष हरकळ, अंकुश कळकळ, सुनील खंडू घोलप. लातूर येथील मनोज डोंगरे, रंजीत गुलाब पाटील, नाशिक आणि स्वप्निल तिरसिंग पाटील चाळीसगाव यांना अटक झालेली आहे. तर 2018  टीईटी परीक्षा प्रकरणी तत्कालीन शिक्षण आयुक्त सुखदेव ढेरे, तुकाराम सुपे, जी ए सॉफ्टवेअर कंपनीचे मालक आश्विन कुमार, प्रितेश देशमुख, अभिषेक सावरीकर, सौरभ त्रिपाठी, संतोष हरकळ, अंकुश सरकार यांना अटक झालेली आहे. 

पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत बीड जिल्ह्याचे समोर आलेले कलेक्शन

पेपरफुटी प्रकरणांमध्ये आतापर्यंत बीड जिल्ह्यातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात उद्धव प्रल्हाद नागरगोजे हा शिरूर तालुक्यातील तिंतरवणी मध्ये शिक्षक आहेत. त्यानंतर मुख्य प्रशासकीय अधिकारी लातूरच्या आरोग्य विभागामध्ये काम करणारे प्रशांत बडगिरे. त्यानंतर मेंटल हॉस्पिटल अंबाजोगाईचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप जोगदंड, नेकनूर च्या स्त्री रुग्णालयात तील कर्मचारी श्याम मस्के, भूम येथील ग्रामीण रुग्णालयात सहाय्यक अधीक्षक राजेंद्र सानप, नामदेव करडे. त्यानंतर संजय सानप, विजय नागरगोजे यांना आतापर्यंत अटक झालेली आहे. आता या प्रकरणातील सर्वात मोठा अधिकारी असलेल्या सुशील खोडवेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सुशील खोडवेकर हे परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव या गावातील रहिवाशी आहेत.

कोण आहे सुशील खोडवेकर?

सुशील खोडवेकर हे मूळ परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील आहेत. यापूर्वी नांदेड परभणी आणि त्यानंतर आता मुंबईत वास्तव्यास आहेत. सुशिल खोडवेकर हे 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत टीईटी परीक्षा गैरव्यवहार झाला, तेव्हा ते शालेय शिक्षण विभागामध्ये उपसचिव होते. यापूर्वी ठाणे पालघर येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प त्यांनी काम केले आहे. तसेच नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये आयुक्त आणि त्यानंतर परभणी जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा सुशील खोडवेकर यांनी काम केले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

TET Exam Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्यात IAS अधिकाऱ्याचा हात, कृषी खात्याच्या उपसचिवाला अटक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी घटलीSpecial Report Girl Safety : सांगली आणि बुलढाण्यात चिमुरड्यांवर अत्याचार, नराधमांना कधी वचक बसणार?Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोडSpecial Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget