एक्स्प्लोर

Sharad Pawar : बारामतीत येणाऱ्या शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांना शरद पवारांचे जेवणाचे निमंत्रण, कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळलं, आता 'गोविंदबागे'चा आग्रह स्वीकारणार का?

Baramati Namo Rojgar Melava : बारामती शरद पवारांचे घर असल्याने शरद पवारांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेवणाचे निमंत्रण देण्यात आले आहे. 

पुणे: बारामती नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने (Baramati Namo Rojgar Melava) मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामतीत एवढा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यादरम्यान एक मोठी माहिती समोर येत आहे. बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी (Sharad Pawar) फोन करून त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) विनंतीवरून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) शरद पवारांचे निमंत्रण स्वीकारणार का हे पाहावं लागेल.

बारामतीत येत्या शनिवारी शासकीय कार्यक्रम असतानाही, राज्यसभेचे खासदार असणाऱ्या शरद पवारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं नाही. आता शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण दिलं असताना ते आमंत्रण स्वीकारलं जाईल का हे पाहावं लागेल. 

बारामतीमध्ये शरद पवारांचे घर असल्याने आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीत येणार असल्याने हे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.

बारामतीला जेव्हा कुणीही येतं त्यावेळी शरद पवार हे आवर्जून त्यांना घरी बोलावतात, अथिती देवो भवः ही आमची संस्कृती असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. राज्याचे मुख्यमंत्री जर बारामतीला येत असतील तर त्यांना बोलावणे ही आमची संस्कृती असल्याचंही त्या म्हणाल्या. 

शरद पवारांना कार्यक्रमाचे निमंत्रण नाही

विद्या प्रतिष्ठान येथील 12 एकराच्या मैदानावर बारामती रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला शरद पवारांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 2 मार्च रोजी बारामतीमध्ये रोजगार मेळावा होणार असून त्या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. राज्यसभेचे खासदार असणाऱ्या शरद पवारांचे नाव मात्र वगळण्यात आल्याने त्यावर राजकीय चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र निमंत्रण देण्यात आलं आहे. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशाराABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 30 January 2025Beed Suresh Dhas PC : एकमेकांबद्दल बोलावंच लागतं, कोणाचं काय झालं हे अधिकाऱ्यांना विचारा : धसRaj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Embed widget