![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Rape : भाऊच ठरला नराधम! भाऊ अन् त्याच्या मित्रांनी केले कर्णबधिर बहिणीवर लैंगिक अत्याचार
पुण्यात भाऊ आणि त्याच्या मित्रांकडून अल्पवयीन कर्णबधिर बहिणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
![Pune Rape : भाऊच ठरला नराधम! भाऊ अन् त्याच्या मित्रांनी केले कर्णबधिर बहिणीवर लैंगिक अत्याचार pune Rape News a minor deaf girl was raped by three people including her brother Pune Rape : भाऊच ठरला नराधम! भाऊ अन् त्याच्या मित्रांनी केले कर्णबधिर बहिणीवर लैंगिक अत्याचार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/17/52e73765c704ade3b13647cd4bddfd101702778506374584_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Rape : पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यातच बलात्काराच्या घटनादेखील वाढ झाली आहे. पुण्यात भाऊ आणि त्याच्या मित्रांकडून अल्पवयीन कर्णबधिर बहिणीवर (Pune Rape) बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कर्णबधिर शाळेमधील शिक्षिकेकडे यासंदर्भात माहिती दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 2018 पासून 2023 पर्यंत सुरू होता.
या प्रकरणी तीन जणांविरोधात बलात्कार, पॉक्सो, विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका कर्णबधिर शाळेच्या शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. मुलगी ही कर्णबधिर असून ती 17 वर्षांची आहे. तिघांनी वेगवेगळी कारणं सांगून तिच्यावर बलात्कार केला आहे. सागर रजाने, राहुल पाटील या दोघांनी लग्नाचं आमिष दाखवून आणि घरात शिरुन जबरदस्तीने बलात्कार केला आणि कोणाला सांगितलं तर मारुन टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुलीच्या भावाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेतला आणि स्वत:च्या बहिणीवरच बलात्कार केला आहे. या घटनेमुळे सगळीकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षा करणाऱ्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याने विश्वास नेमका कोणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
नात्याला काळीमा फासणारी घटना
काही दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीवर सलग 15 दिवस लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. लैंगिक अत्याचार करुन मुलीला आईवडिलांना कोयत्याने मारुन टाकण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला गेला. पुण्यातील उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली होती या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, पोलीसांनी नराधम इरफान शेख आणि आयुब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली होती.
यामुळे समुपदेशन गरजेचं
सध्या पुण्यात अनेक शाळांमध्ये शाळकरी मुलींसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या समुपदेशनाचा वर्ग घेतला जातो. त्यात अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. सायकोलॉजिस्ट किंवा इतर डॉक्टर प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतात. या संवादातून विद्यार्थिनींना अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. लैंगिकतेबाबत माहिती दिली जाते. त्यासोबतच गुड टच बॅड टच याची देखील उत्तम प्रकारे माहिती दिली जाते. यामुळे विद्यार्थिनींना लैंगिक छळाबाबत माहिती मिळते. कधी काळी त्यांच्यावर अशा पद्धतीने काही गैरवर्तन केलं का? ते तुमचे कोण होते? अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. या सगळ्यांचा शाळकरी मुलींना फायदा होत आहे आणि यातून रोज नवे प्रकरणं समोर येत असून त्या आरोपींवर गुन्हा देखील दाखल होत आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)