Pune Porsche Car Accident : ड्रायव्हरला डांबून नेणारी मर्सिडीज जप्त; अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणी वाढणार
पुणे पोलिसांनी ड्रायव्हर गंगाराम याला ज्या गाडीतून जबरदस्तीने बसवून नेलं ती गाडी जप्त केली आहे. ब्राऊन रंगाची मर्शिडिस पोलिसांनी जप्त केली आहे.
पुणे : पुणे पोर्शे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यात पुणे पोलीस कसून चौकशी करताना दिसत आहे आणि एक एक बारीक सारीक घटनेचा आढावा घेताना दिसत आहे. त्यात आता पुणे पोलिसांनी ड्रायव्हर गंगाराम याला ज्या गाडीतून जबरदस्तीने बसवून नेलं ती गाडी जप्त केली आहे. ब्राऊन रंगाची मर्सिडीज पोलिसांनी जप्त केली आहे. MH 12 PC 9916 असा या गाडीचा नंबर आहे. गंगाराम पुजारीला याच गाडीतून अज्ञात स्थळी सुरेंद्र अग्रवाल यांच्या कुटुंबियांनी नेलं होतं.
अपघाताच्यावेळी पोर्शे कारमध्ये गंगार पुजारी ड्रायव्हर होता. मात्र कार बिल्डर पूत्र चालवत होता. याच कारचा अपघात झाला आणि दोघांचा जीव गेला. त्यानंतर गंगाराम पुजारीला सुरेंद्र अग्रवाल यांच्या कुटुंबियांनी अज्ञात स्थळी नेऊन डांबून ठेवलं आणि अपघात झाला तेव्हा मी गाडी चालवत होतो. अपघात माझ्या हाताने झाला असा जबाब द्यायला सांंगितला आणि त्याला हवं ते देण्याचं मंजूर केलं पुण्यात फ्लॅट देण्याचंदेखील मंजूर केलं होतं. मात्र त्यानंतर गंगाराम पुजारी यांनी कोर्टात यासंदर्भात माहिती दिली आणि अग्रवाल कुटुंब गोत्यात आलं.
ड्रायव्हरला बांधून ठेवल्या प्रकरणी सुरेंद्र अग्रवालला अटक करण्यात आली आहे. त्यासोबतच ड्रायव्हरला खोटी माहिती दे असं सांगितल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गंगाराम पुजारीने थेट कोर्टात सगळं सांगितलं अन् कुटुंबियांचा खरा चेहरा समोर आला. ड्रायव्हरने सुरेंद्र अगरवाल, विशाल अगरवाल याच्या विरोधात या गाडीतून नेल्याचे आरोप केले होते.अपघात झाल्यानंतर ज्या गाडीने पुजारीला अज्ञातस्थळी घेऊन गेले होते. तिच गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
ब्राऊन रंगाची ही मर्शिडिज कार आहे. याच कारमधून ड्रायव्हरला नेण्यात आलं होतं. या कारला आता येरवडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. या कारची पूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. ही कार कुठे कुठे फिरून आली. कुठे नेण्यात आली होती. डांबून नेताना ही गाडी कोण चालवत होतं?, याची चौकशी करण्यात येणार आहे. ही कार मुंबईत जाऊन आल्याची माहिती आहे. ही कार मुंबईत कुठे गेली होती. याची माहितीदेखील घेतली जाणार आहेत.
इतर महत्वाची बातमी-