Pune Porsche Car Accident : घरातील सुनेला हात घातल्याची केस झाली अन् दोन भाऊ अधिकच सुडाला पेटले; पुण्यातील नेत्याने अग्रवाल फॅमिलीची कुंडलीच मांडली
पैसेवाले असल्याने सगळे विकत घेऊ शकतो, असं त्यांना वाटते. कायदा आणि सुव्यवस्थेची त्यांना अजिबात भीती नसल्याचेही अजय भोसले म्हणाले. ते कोणत्याही खात्यात गेल्यास त्यांना व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते.

Pune Porsche Car Accident : पुण्यातील ब्रह्मा ग्रुपच्या अग्रवाल कुटुंबातील अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री रस्त्यावर दोघांना चिरडून मारल्यानंतर पुण्यासह राज्यभरातच नव्हे तर अवघ्या देशामध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून झालेली मिटवामिटवी (Pune Porsche Car Accident) ही पुणे पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारी होती. अजित पवार गटाच्या आमदारावरही आरोप होत आहेत. आता या प्रकरणांमध्ये सर्वच पातळीवरून दबाव आल्यानंतर कारवाईने वेग पकडला आहे. या प्रकरणाशी निगडीत अनेकांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
अग्रवाल कुटुंबाची अजय भोसलेंनी कुंडलीच मांडली
दरम्यान, आता अग्रवाल कुटुंबांमधील एक एक करत अनेक कारनामे बाहेर येत आहेत. अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध समोर आल्यानंतर आता कुटुंबामध्ये असलेला वाद सुद्धा समोर आला आहे. अग्रवाल कुटुंबातील राम कुमार अग्रवालशी जवळचे संबंध असलेल्या माजी नगरसेवक अजय भोसले यांच्या हत्येची भाऊ सुरेंद्र कुमार अग्रवालकडून देण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू असून 10 ते 12 जणांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या आहेत. दरम्यान ज्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला त्या अजय भोसले यांच्याशी एबीपीने संवाद साधला. ते पुण्यातील शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख आहेत. अजय भोसले यांनी एबीपी माझाशी बोलताना अग्रवाल फॅमिलीची कुंडलीच मांडली.
राम कुमार अग्रवालने सुनेला हात घातल्याची तक्रार
दरम्यान, अजय भोसले यांचे राम अग्रवाल यांच्याशी संबंध होते आणि जिवलग मित्र असल्याने सुरेंद्र कुमार अग्रवालने हत्येची सुपारी देण्यात आली होती. दरम्यान, भोसले यांनी राम कुमार अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याशी नेमका वाद आहे तरी काय? याबाबत विचारले असता म्हणाले की, त्यांच्यामध्ये पैशावरून वाद सुरू होता आणि हा वाद काही हजार कोटींमध्ये होता. याच वादादरम्यान राम कुमार अग्रवालने सुनेला हात घातल्याची तक्रार सुरेंद्र कुमार अग्रवालने पोलिस ठाण्यामध्ये दिली होती. सुनेच्या मदतीनेच ही केस करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये राम कुमार हा कुटुंबासह 15 ते 20 दिवस फरार झाला होता. अटकपूर्व जामीन घेतल्यानंतर तो परत आला होता, असेही भोसले यांनी सांगितले. या प्रकरणानंतर दोघांमधील दुश्मनी आणखी वाढल्याचे ते म्हणाले. पैसेवाले असल्याने सगळे विकत घेऊ शकतो, असं त्यांना वाटते. कायदा आणि सुव्यवस्थेची त्यांना अजिबात भीती नसल्याचेही ते म्हणाले. ते कोणत्याही खात्यात गेल्यास त्यांना व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते.
307 सारखे गंभीर गुन्हे देखील दाखल
ते म्हणाले की, अख्खी अग्रवाल फॅमिली क्रिमिनल असून प्रत्येकावर एक दोन गुन्हे दाखल आहेत. 307 सारखे गंभीर गुन्हे देखील दाखल असल्याचे भोसले यांनी सांगितले. मात्र, जेव्हा जेव्हा सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही केस मागे घेण्यासाठी धमकीचे फोन आल्याचे भोसले यांनी सांगितले. मात्र, मी यांच्या धमक्यांना न घाबरता जिथं जवळचं पोलिस स्टेशन असेल त्या ठिकाणी जाऊन तक्रार दिली असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
