संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस, ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या!
Sambhaji Bhide Guruji : ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे नोटीसीत म्हटले आहे.
![संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस, ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या! Pune Police Issued notice to Sambhaji Bhide Shivpratishthan Dnyaneshwar and tukaram Maharaj Palkhi Ashadhi Wari Pune News संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस, ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/96bc7117338ba87136a8c31b27425148171974115743989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) पालख्या दाखल होणार आहे. शिवप्रतिष्ठानच्या (Shiv Pratishthan) धारकरी कार्यकर्त्यांना तुकोबांच्या पालखी समोर चालण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांनी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या 'शिवप्रतिष्ठान'ला एक नोटीस पाठवली आहे. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे नोटीसीत म्हटले आहे.
संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. परंतु, दिंड्यांची शिस्त न मोडता तसेच पालखी सोहळ्यात विलंब होणार नाही याची काळजी घेत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. तसंच भिडे गुरुजी जर वारकरी म्हणून सहभागी होत असतील तर हरकत नाही, असं आळंदी देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले आहे. यापूर्वी भिडे गुरूजी आणि त्यांच्या समर्थकांनी वारीत शस्त्र आणल्याने आणि तेढ निर्माण करणारी भाषण केली होती, त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. यंदा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची नोटीस दिली आहे.
शिवप्रतिष्ठानचे धारकरी जंगली महाराज मंदिरात दाखल
संभाजी भिडे गुरुजींनी पुण्यातील जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात घेतलं दर्शन घेतले. पालखी पुण्यात दाखल झाल्यानंतर भिडे गुरुजी थोड्याच वेळात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणारं आहेत. वारीत सहभागी होण्याआधी भिडे गुरुजी यांनी दरवर्षीप्रमाणे जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतलं भिडे गुरुजी यांच्यासोबत वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र भरातून शिवप्रतिष्ठानचे धारकरी जंगली महाराज मंदिरात दाखल झाले आहेत.
पुणे पोलिसांनी का नोटीस दिली?
काही वर्षापूर्वी पुण्यात ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत अडथळा आणल्याप्रकरणी गेल्यावर्षी सुमारे एक हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील गुडलक चौकात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात वादावादी झाली होती गेली काही वर्षे संभाजी भिडे गुरुजींच्या संघटनेतील लोक ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये घुसतात. गेल्या वर्षी भिडे गुरुजी संघटनामधील काही व्यक्तींच्या हातामध्ये तलवारी आणि डोक्याला फेटे घालत प्रवेश केला होता. यावरुन मोठा गोंधळ झाला होता. यामुळे पालखी सोहळा समितीच्या वतीने यावेळी देखील पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर नोटीस देण्यात आला आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही, शरद पवारांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)