Pune : कात्रजमध्ये 10 ते 12 गॅस सिलेंडरचा स्फोट, 100 सिलेंडरचा अनधिकृत साठा
Pune Latest News : कात्रजजवळ 10 ते 12 गॅस सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी अथवा जखमी झालेले वृत्त नाही
![Pune : कात्रजमध्ये 10 ते 12 गॅस सिलेंडरचा स्फोट, 100 सिलेंडरचा अनधिकृत साठा Pune News gas cylinder explosion in katraj gandharv lawns pune Maharashtra Pune : कात्रजमध्ये 10 ते 12 गॅस सिलेंडरचा स्फोट, 100 सिलेंडरचा अनधिकृत साठा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/29/c59b02cbc97b70c2482f793011c814ee_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Latest News : कात्रजजवळ 10 ते 12 गॅस सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी अथवा जखमी झालेले वृत्त नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, कात्रज, गंधर्व लॉन्सजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे 100 गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. यामध्ये अचानक स्फोट झाला. एकामागून एक दहा ते 12 गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
कात्रजमध्ये अचानक गॅस सिलिंडरच्या स्फोटाचे आवाज ऐकू आले. स्फोट झाला त्यावेळी बाहेर लहान मुले खेळत होती. त्यामुळे एकच धावपळ झाली. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरातील घरावरील पत्रे उडाले. गाड्या जळून खाक झाल्या. परिस्थितीचे गांभिर्य पाहून परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. परिसरामध्ये रस्ते खूप अरूंद आहेत. त्यामुळे अग्निशामन दलाच्या गाड्यांना पोहचण्यास उशीरा पोहचल्या. सध्या आग आटोक्यात आल्याचे अग्निशामन दलाकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळावर सहा अग्निशामन दलाच्या गाड्या आणि चार पाण्याचे बंब आहेत. सध्या आग आटोक्यात आली आहे. कुलींगचं काम सुरु आहे.
पुण्यातील कात्रज जवळील गंधर्व लॉन्स येथे सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान गॅस सिलेंडरचे मोठे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटमुळे सदरील गोडाऊनला आग देखील लागली होती. या गोडाऊन मध्ये जवळपास वीस सिलेंडरचा स्फोट एकदाच झाल्याने. आग मोठी भीषण होती. मात्र यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु गोडाऊनचा मालक सागर पाटील आणि त्याच्यासोबत एक इसम किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे . माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या.... गाड्या दाखल झाल्या होत्या. यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी हा स्पॉट मात्र भीषण होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. घटनेत गोडाऊनचे संपूर्णपणे नुकसान झाले असून. या गोडाउनमध्ये अवैध रित्या सिलेंडर ठेवले असल्याची माहितीदेखील मिळत आहे. दरम्यान गोडाऊनच्या जवळच असलेल्या अनेक गाड्यांचे देखील या स्फोटामुळे नुकसान झाल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)