(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Sharad Pawar : शरद पवार येताच एकच जल्लोष; विद्यार्थ्यांची खचाखच गर्दी पाहून शरद पवार म्हणाले, या मंचावर बसा...
ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar Pune) पुण्यात विद्यार्थ्यांसोबत थेट संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची खचाखच गर्दी पाहायला मिळाली.
पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar Pune) पुण्यात विद्यार्थ्यांसोबत थेट संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची खचाखच गर्दी पाहायला मिळाली. शरद पवार येताच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरु केली. विद्यार्थ्यांची एवढी गर्दी पाहता शरद पवारांनी बसायला जागा नसणाऱ्यांना मंचावर येवून बसायला सांगितलं. या सगळे वर मंचावर बसा, असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना वर मंचावर बोलवून घेतलं. यावेळी स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा आणि अडचणी मांडल्या. यावेळी शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.
चौफेर विद्यार्थी अन् मध्ये शरद पवार!
बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी खचाखच गर्दी केली होती. राज्याच्या विविध भागातून पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येत असतात. त्यात अनेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून येतात. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या घरातील परिस्थिती हलाखीती असते. त्यात आई-वडिल पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात. हेच अनेक विद्यार्थी आपली परिस्थिती, कुटुंब आणि शिक्षण याचं समतोल राखत पुण्यात अभ्यास करत असतात. याच सगळ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या मागण्या आज या विद्यार्थी संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद पवारांनी ऐकून घेतल्या.
महिलांना कमी लेखण्याची गरज नाही!
याच कार्यक्रमात एका विद्यार्थीनीने महिला सक्षमीकरणासंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारला. देशाच्या किंवा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अतिशय कमी आहे, याची कारणं कोणती असू शकतात?, असं विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात महिलांना कमी लेखण्याची गरज नाही. कर्तृत्व तुम्ही महिला आहे की पुरुष यावर ठरत नाही. महिलांमध्ये कर्तृत्व आहे, त्यांना संधी दिली पाहिजे. संरक्षण दलात महिलांच्या समावेशाचा निर्णय मी घेतला. आज दिल्लीत होणाऱ्या परेडचे नेतृत्व महिला करते.
साहेब आमचे वाली!
स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना शरद पवारांकडून अनेक अपेक्षा असतात. कारण आतापर्यंत स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल शरद पवारांनी नेहमीच घेतली आहे. त्यात मागच्या वर्षी स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात विविध मागण्यासाठी मोठा लढा उभा केला होता. त्यावेळी अनेक नेत्यांनी या आंदोलनाला भेटी दिल्या मात्र आंदोलन मागे घेण्यासाठी विद्यार्थी तयार नव्हते. मात्र शरद पवारांनी आंदोलनाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या होत्या आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. जेव्हा जेव्हा देश अडचणीत आला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला, शरद पवार आमचे आजचे शिवाजी महाराज आहेत, आपण त्यांचे मावळे व्हायचे आहे, असं विद्यार्थी म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-
तरुणीवरील कोयत्याचा वार झेलणाऱ्या लेशपालचा शरद पवारांना थेट सवाल, म्हणाला....