रक्ताचे सॅम्पल कचऱ्यात फेकणारे अजय तावरे, श्रीहरी हरनोळ निलंबित; 'ससून'चे डीन विनायक काळे सुद्धा सक्तीच्या रजेवर
Pune Kalyani Nagar Accident : पुणे अपघात प्रकरणातील (Pune Kalyani Nagar Accident) ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरणात अखेर राज्य सरकारकडून धडक कारवाई करण्यात आली आहे.
Pune Kalyani Nagar Accident : पुणे अपघात प्रकरणातील (Pune Kalyani Nagar Accident) ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरणात अखेर राज्य सरकारकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल फेकून देऊन लाच खाणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने निलंबन करण्यात आले आहे. शिवाय महत्वाचे म्हणजे बी जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे (Vinayak Kale) यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला.
हसन मुश्रीफ काय काय म्हणाले?
ससून फेरफार प्रकरणात समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल आला. अधिष्ठाता यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. मी आधीच सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट आहे त्यावर कारवाई होईल. यापुढे कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यात असं प्रकरण त्यांना करता येणार नाही अशा प्रकारचे शिक्षा किंवा कारवाई होईल. त्याप्रमाणे आपण कारवाई केली आहे. संपूर्ण चौकशी होईल त्यांचा सुद्धा मत घेतला जाईल. त्यांना योग्य प्रकारे धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. अधिष्ठाता यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. आणि दोघांना निलंबित केले आहे. 26 तारखेला ही घटना मला कळाली. त्याच वेळा मी सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणे ही फार मोठी दुर्दैवी घटना आहे. लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. अशाप्रकारे घटना घडतात कामा नये यासाठी मी निर्देश देखील दिले, असं मंत्री हसन मुश्रीफ याबाबत बोलताना म्हणाले.
अजय तावरेंच्या घरी पोलिसांची धाड
अल्पवयीन आरोपी घटना घडली तेव्हा नशेत होता, हे सिद्ध होऊ नये यासाठी डॉक्टरांनी लाचेच्या लालसेपोटी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलेले असल्याचा आरोप डॉक्टरांवरती आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी रोज नवे अपडेट समोर येत आहेत. अल्पवयीन मुलाच्या आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल यांच्याकडून 14 फोन कॉल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अजय तावरे ब्लड सॅम्पल बदलताना अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी सातत्याने बोलत होता, असं स्पष्ट झालंय.
ज्याअर्थी, कल्याणी नगर, पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे केलेल्या वैद्यकीय तपासणी व उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने त्यांचा अहवाल सादर केला आहे. समितीने डॉ. अजय तावरे, प्राध्यापक व विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र व डॉ. श्रीहरी हाळनोर, वैद्यकीय अधिकारी, बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय, पुणे यांच्याविरुध्द कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळ यांचे निलंबन
अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. यांच्याविरूध्द जोपर्यंत निलंबनाचे आदेश अंमलात आहेत, त्यांना निर्वाह भत्ता आणि पूरक भत्ते देय राहतील, असं सांगण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या