अमेरिकेत जन्म, घरी श्रीमंती... व्यसनाच्या आहारी गेला अन् पुण्यात सराईत गुन्हेगार झाला!
Pune Crime Update : पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बंडगार्डन पोलीसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे त्याचा जन्म अमेरिकेत झालेला आहे.

Pune Crime Update : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्रग्सच्या आहारी गेलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बंडगार्डन पोलीसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे त्याचा जन्म अमेरिकेत झालेला आहे. तो सदन घरातील आहे. परंतु, पैशांसाठी तो चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे.
नोएल शबान (वय 23 ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पुणे स्टेशन, ससून रुग्णालय तसेच रेल्वे स्थानक परिसरात परराज्यातून नागरिक येत असतात. पुण्याच्या विविध भागात जाण्यासाठी येथून पीएमपीएल असतात. त्यामुळे येथे दिवसभर मोठी वर्दळ असते.
या भागात प्रवाशांचे मोबाईल हिसकावून नेल्याच्या घटना सतत घडत असत. त्यामुळे बंडगार्डन पोलीसांकडून या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त व पेट्रोलिंग करत होते. दरम्यान एका गुन्ह्याचा तपास सुरू होता. त्यात पोलीसांनी तब्बल या भागातील 150 शासकीय आणि खासगी असे दोनशेहून अधिक सीसीटीव्ही पडताळले.
त्यात नोएल दिसून आला. त्यानुसार त्याचा शोध घेतला जात होता.त्याला पकडले व चौकशी केली असता त्यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. त्याला अटक करत सखोल तपास केला असता त्याने अनेक गुन्हे केल्याचे दिसून आले. त्याच्याकडून तब्बल 18 मोबाईल व चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
नोएलवर यापुर्वीचे 14 गुन्हे दाखल आहेत.तो ड्रग्सच्या आहारी गेलेला आहे. त्याची आई आजारी असते. वडिलांचे निधन झालेले आहे. वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल होता.
नोएल याची आजी अमेरिकेतील न्यूयार्क शहरात असते. त्यांचे तिथे मॉल्स आहेत. तर, पुण्यात देखील घर आहे. नोएलचा जन्म अमेरिकेत झाला होता. पाच वर्ष त्याला आजीने सांभाळले होते. त्यानंतर वडिलांनी त्याला पुण्यात आणले होते. मात्र आता त्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याला येरवडा जेलमध्ये जावे लागणार आहे .
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या
PM Modi about Vaccine for children : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीन मोठ्या घोषणा, बूस्टर डोसबाबतही महत्त्वाची माहिती
PM Modi Speech Highlight : 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू : पंतप्रधान मोदी
COVID-19 Vaccine for Children : 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला DCGI ची परवानगी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
