एक्स्प्लोर

Pune Crime News : लय मोठा भाई झालास का? भाईगिरीवरुन वाद वाढला अन् मित्राच्या कानाचा थेट लचकाच तोडला; पुण्यातील घटना

Pune Crime news : पुण्यात भाईगिरीच्या वादातून कानाचा लचका तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे. 

पुणे : पुण्यातील गुन्हेगारी काही संपायचं नाव (Pune Crime news) घेत नाही आहे. त्यात भाईगिरीचे प्रकारही वाढले आहे. कधी कोणी कोणाचा पडशा पाडताना दिसत आहे तर कधी कोणी कोणावर थेट गोळीबार करताना दिसत आहे. यात क्षृल्लक कारणावरुन झालेल्या वादांचं प्रमाण जास्त आहे. त्यातच आता भाईगिरीच्या वादातून कानाचा लचका तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे. 

नेमकं काय घडलं?

तीन मित्र पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या मार्केट यार्ड रोडवर गप्पा करत होते. यावेली एका मित्राने मी मोठा भाई असल्याचं सांगितलं यावरु दुसऱ्या मित्राला राग आला आणि त्याने तू खूप मोठा भाई झालास का?  असा प्रश्न विचारला. हे सगळं सुरु असताना दुसऱ्या मित्राचा राग अनावर झाला आणि त्याने थेट हल्ला करत कानाचा लचका तोडला, डोक्याला दगडाने मारहाण केली आणि हा मित्र एवढ्यावरच न थांबता  दारूची फुटलेली बाटली घेऊन मारण्यासाठी फिर्यादीचा पाठलाग केला. यावेळी जखमी झालेला मित्राने परिसरातून पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला. याप्रकरणी हर्ष कैलास कांबळेवय 20 यांनी स्वारगेट पोलीस  ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून सौरभ नितीन आदमाने (वय 24)  आणि पवन काळे  या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यात रोज नवे भाई अन् टोळ्या

पुण्यात मागील सहा महिन्यांपासून कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. त्यांचा हा धुमाकूळ कमी करण्याससाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहे. मात्र सध्या बघायला गेलं तर पुण्यात रोज नवी एक टोळी तयार होताना दिसत आहे आणि रोज नवा भाई तयार होताना दिसत आहे. भररस्त्यात मारहाण करणं, गाड्या फोडून दहशत निर्माण करणं, एकमेकांवर क्षृल्लक कारणावरुन हल्ले करणं हे प्रकार सुरुच आहे. भाईगिरीच्या नावाने पुण्यात अनेक परिसरात धुमाकूळ माजवला जात असल्याचं घडत असलेल्या घटनांमधून दिसत आहे. 

विशीतील तरुण गुन्हेगारीत

पुण्यातील गुन्हेगारीतील आरोपींचं वय बघितलं तर विशीतील तरुण आरोपी असल्याचं दिसून येत आहे. कॉलेजमध्ये दादागिरीपासून सुरु झालेली गुन्हेगारी मोठ्या टोळ्यांपर्यंत येऊन पोहचतो. त्यामुळे या तरुणांना योग्य मार्गदर्शन करणं आणि त्यांना गुन्हेगारीपासून लांब ठेवणं हे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; सात राज्यातील दहा मुलींची सेक्स रॅकेटमधून सुटका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Embed widget