Rohit Pawar On Ajit Pawar : पुतण्याचा काकावर पलटवार! अजित दादांकडून ही अपेक्षा नव्हती; रोहित पवारांचा हल्लाबोल
बारामतीमध्ये माझ्या कुटुंबीयांशिवाय इतर पवार कुटुंबीय माझा प्रचार करणार नाहीत, असं वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रोहित पवार यांनी प्रतिउत्तर दिले. दादा असे भावनिक आव्हान करतील असं वाटलं नव्हतं असं ते म्हणाले.
पुणे : बारामतीमध्ये माझ्या कुटुंबीयांशिवाय इतर पवार कुटुंबीय माझा (Political News) प्रचार करणार नाहीत, असं वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar)यांना रोहित पवार (Rohit Pawar) (Baramati Loksabha) यांनी प्रतिउत्तर दिले. दादा असे भावनिक आव्हान करतील असं वाटलं नव्हतं असं ते म्हणाले. दादांनी घेतलेला निर्णय जनतेसह पवार कुटुंबीयांनाही आवडलेला नाही, असं ही ते म्हणाले. आळंदीमध्ये सुधीर मुंगसे या कार्यकर्त्यांना भेटायला आले असता ते बोलत होते.
बोलताना अजित दादा यांनी मी मुलगा असतो तर मला आणखी काही मिळालं असतं असं वक्तव्य केलं, त्याचाही रोहित पवार यांनी समाचार घेतला अजित पवार यांना अनेक पदं मिळाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता आणि आता ते भाजपबरोबर गेलेत ते पदासाठीच का ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचंही ते म्हणाले बारामतीतून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर बोलताना जेव्हा त्याची अधिकृत घोषणा होईल, त्यानंतर आम्ही प्रचार सुरू करू, असे ते म्हणाले.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार बारामतीकरांना भावनिक साद देतील ही अपेक्षा नव्हती आणि अजित पवारांचा हा निर्णय लोकांना आणि कुटुंबालादेखील पटला नाही आहे. मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर मला वेगळं काहीतरी मिळालं असतं, असं अजित पवार म्हणाले. मात्र मंत्री, उपमुख्यमंत्री पद त्यांना मिळालं. राज्याचे प्रमुख निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. आता त्यांना अजून वेगळं काय पाहिजे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अजित पवार भाजपसोबत जाण्याचं कारण पद आहे का? आणि पद असेल तर विचारसरणी कुठे गेली?, असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले आहे. भाजपला जे जमलं नाही ते अजित पवारांच्या माध्यमातून भाजप करण्याचा प्रयत्न करत आहेत. पवार विरुद्ध पवार हा संघर्ष भाजप करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
अजित पवार काय म्हणाले होते?
काल (16 फेब्रुवारी) अजित पवारांनी बारामतीतून शरद पवारांवर आणि सुप्रिया सुळेंवर फटकेबाजी केली होती. त्यावेळई ते म्हणाले होते की, आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार पडला तर देशाच्या राजकारणातील माझी किंमत कमी होईल. त्यामुळे निवडणुकीला मतदान करताना भावनिकपणे विचार करु नका. भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. कामं ही तडफेनेच करावी लागतात, जोरकसपणे करावी लागतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला विक्रमी मतांनी निवडून दिले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून लीड मिळालं पाहिजे.
इतर महत्वाची बातमी-