एक्स्प्लोर

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक; टीईटी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप

Mhada Paper Leak : म्हाडा पेपरफुटीची व्याप्ती वाढत असून इतर परीक्षांमधील गैरप्रकार समोर येऊ लागले आहेत. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक केली आहे.

Mhada Paper Leak Updates : म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपे यांनी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांच्यानंतर आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी .ए . टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्या पिंपरी - चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रं सापडली होती. त्यामुळे टीईटीच्या परीक्षेत घोटाळा झाला असल्याचा पोलिसांचा संशय बळावला होता. गुरुवारी सकाळपासून तुकाराम सुपेंना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अखेर आज पुणे पोलिसांनी सुपे यांना अटक केली आहे. सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा  सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे..

जी. ए. टेक्नॉलॉजीकडे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीस पोलीस भरती प्रक्रियेचीही जबाबदारी होती. त्याचबरोबर प्रितेश देशमुख प्रमुख असलेल्या जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे महाराष्ट्रातील तब्बल 20 जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळं या कंपनीकडून राबवण्यात आलेल्या सगळ्याच भरती प्रक्रियांबद्दल संशय निर्माण झालंय. पेपर फुटीचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांना एका प्रकरणाचा तपास करता करता आणखी एका परीक्षेचा देखील पेपर फुटल्याचं समजलं. त्या दुसऱ्या प्रकरणाचा तपास सुरु केला की, आणखी एका तिसऱ्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचं लक्षात येत आहे. पेपर फुटीचं हे चक्र प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्रावून सोडणारं ठरतंय. 

जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे या परीक्षांसाठी उमेदवारांना हॉल तिकीट देणे, पेपरची छपाई करणे, परीक्षा घेणे, पेपर जमा करणे, त्यांचं स्कॅनिंग करून त्याद्वारे गुण देऊन निकाल जाहीर करणे अशी सर्व प्रकारची जबाबदारी होती. पण ही कंपनीच गोपनियतेचा भंग करत असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचं कंत्राट देणं किती धोकादायक आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहितीVivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हेOld Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवारTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 10 am ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Embed widget