(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोणावळ्यात टायगर पॉईंटला जाताय तर ही बातमी वाचा, रात्री 12 पासून लागू झालेत हे नवे पाच नियम
अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेलेल्या परिसरात जाण्यास पर्यटकांना 31 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आलीये. प्रशासनाने नव्यानं पाच नियम रात्री बारा पासून लागू केलेले आहेत.
पुणे : अन्सारी-सय्यद कुटुंबीय वाहून गेले, त्या परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने लोणावळ्यात नवी नियमावली लागू करण्यात आले आहे. लोणावळ्यात (Lonavala) अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय जिथून वाहून गेले, त्या परिसरात आता पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) आदेशानंतर प्रशासनाने लोणावळ्यासाठी विशेष नियमावली लागू केली आहे. त्यामध्ये अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेलेल्या परिसरात जाण्यास पर्यटकांना 31 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आलीये. प्रशासनाने नव्यानं पाच नियम रात्री बारा पासून लागू केलेले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश कुठं आणि कसे लागू असतील?
1. सहारा पुलावर वाहने पाकींग करण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
2. सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तीन छोटया धबधब्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
3. भूशी धरणाच्या रेल्वेच्या गेस्ट हाऊस पासून वरच्या बाजूला जाण्यासाठी गेस्ट हाऊस पासून पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
4. भूशी धरणाच्या west weir च्या डाव्या बाजूने वन विभागच्या जागेतून वरच्या बाजूच्या धबधब्याकडे जाण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
5. लायन्स पॉईट / टायगर पॉईट शिवलिंग पॉईट येथे सायंकाळी 6 वाजलयापासून सकाळी 6 पर्यंत
मावळ तालुक्यातील सहारा ब्रिज, सहारा ब्रिज समोरील तीन छोटे धबधबे, भूशी डॅम, भूसी डॅम रेल्वे विभागाच्या गेस्ट हाऊस वरचा भाग, भूशी डॅम येथील west woir च्या वरचा भाग, टायगर पॉइंट, लायन्स पॉईट, शिवलिंग पॉईंट इत्यादी ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गर्दीच्या पर्यटन ठिकाणामधील काही धोकादायक ठिकाणे प्रतिबंधित करणे आवश्यक आहे
हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा
लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर करणार आहे. लोणावळा, खंडाळा परिसरातील निसर्गसौंदर्य हे पावसळ्यात पर्यटकांना भुरळ पडत आहे. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. पुणे-मुंबईसह लगतच्या भागातून नागरिक या ठिकाणच्या विविध पॉईंटवर गर्दी करत आहेत. मात्र, पर्यटकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच लोणावळ्यात हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर पर्यटांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही.
लोणावळ्यात 24 तासात 136 मिमी पावसाची नोंद
पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या पुण्यातील लोणावळ्यात दिवसभर धो धो पाऊस झालाय.. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 136 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. यंदा 12 जूनला 106 मिलीमीटर पाऊस कोसळला होता, त्यानंतर काल पावसाने तुफान बॅटिंग केली. आत्तापर्यंत या मोसमात 798 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हे ही वाचा :