Sasoon Hospital Drug Racket : मोठी बातमी! ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारीच बदलले, नेमकं काय आहे ठोस कारण?
ललित पाटील ड्रग्ज (Pune Crime) प्रकरणाच्या तपासातील (Sasoon Hospital Drug Racket) मोठी आणि महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी बदलण्यात आले
पुणे : ललित पाटील ड्रग्ज (Pune Crime) प्रकरणाच्या तपासातील (Sasoon Hospital Drug Racket) मोठी आणि महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. ललित पाटील प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे करणार करणार आहे. याआधी हा तपास गुन्हे शाखेचे सुनील थोपटे करत होते. मात्र सुनील तांबे यांचा गंभीर गुन्ह्यांच्या तपासातील अनुभव लक्षात घेऊन तपास त्यांच्याकडे सोपवण्याचा पुणे पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आहे.
भुषण पाटीलला घेऊन पुणे पोलिसांचे पथक नाशिकमध्ये पोहचलं आहे. एमआयडीसीमधील ज्या कारखान्यात भुषण पाटील मेफेड्रॉन तयार करत होता त्या ठिकाणचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर भुषण पाटीलला त्याच्या घरी नेऊनदेखील त्याची चौकशी करण्यात येणार आहे. ड्रग माफिया ललित पाटीलचा भाऊ असलेला भुषण पाटील मेफेड्रॉन तयार करण्यात सहभागी होता. ससूनमधील ड्रग रॅकेट उघडकीस आल्यानंतर तो फरार झाला होता. पुणे पोलीसांनी त्याला उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून अटक केली होती.
ललित पाटील नेपाळला पळून गेल्याची शक्यता
ड्रग माफिया ललित पाटील नेपाळमध्ये पळून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मेफेड्रोन विक्रीच रॅकेट चालवत असल्यानं ललित पाटीलचे देशातील आणि देशाबाहेरील अनेक ड्रग्ज माफियांशी आधीपासूनच संबंध आहेत. त्याचाच आधार घेऊन ललित पाटीलने नेपाळमध्ये आश्रय घेतला असण्याची शक्यता आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नेपाळ सीमेवर अटक केली मात्र ललित पाटील पुणे पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला आहे .
'ससून'च्या अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सगळे चौकशीच्या फेऱ्यात
सध्या पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात अनेकांचे धारेदोरे पुढे येत आहे. यामध्ये पोलीस, ससून रुग्णालयातील व्यवस्थापन आणि राजकीय नेत्यांवर या प्रकरणात संशयाची सुई आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समिती आरोप प्रत्यारोरानंतर आता चौकशी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत 80 जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.
यामध्ये 'ससून' रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सगळे चौकशीच्या फेऱ्यात आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, कक्ष क्रमांक 16 मधील कर्मचारी यांची समितीकडून कसून चौकशी करण्यात आली. याचबरोबर 2020 पासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णांची माहिती समितीने मागितली. या चौकशीतून अनेक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ससून ड्रग्ज प्रकरणात ही चौकशी समिती महत्वाची भूमिका बजावणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune news : भारताच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान पोलिस आणि माजी नगरसेवकामध्ये बाचाबाची