एक्स्प्लोर

VIDEO : पुणे अपघात प्रकरणी पोलिसांच्या तपासातील 'ती' चूक शोधून काढली, असिम सरोदेंचे पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

Asim Sarode On Pune Accident : पुणे प्रकरणात दोन FIR करणे चुकीचं असून पोलिसांनी दारूबंदीचे कलम का लावलं नाही असा सवाल कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी केला. 

पुणे : दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवून दोघांचा जीव घेतलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना ज्युएनाईल अॅक्टनुसार न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पण या प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे का दाखल केले, तसेच पबकडून दारुबांदी कायद्याची अंमलबजावणी झाली नसतानाही या प्रकरणात दारूबंदीचे एकही कलम का लावलं नाही असा सवाल कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केला. 

काय म्हणाले असिम सरोदे? 

या केसमध्ये दोन एफआयआर असणे ही चूक आहे. इतर कलमं लावली असली तरी दारूबंदी कायद्याचं एकही कलम लावलं नाही. दारूबंदी कायद्यानुसार वेगवेगळे परमिट देण्यात येतात. त्यानुसार कुणाला दारू द्यायची हे ठरलेलं असतं. या सगळ्या गोष्टींचे रजिस्ट्रेशन व्हायला हवं. पण अल्पवयीन मुलाला दारू देण्यात आली आणि नंतर हा अपघात घडला. दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी होत नसताना पोलिसांनी दारूबंदीचे कलम का लावलं नाही हे माहिती नाही. 

वडिलांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही

ज्या कारणांमुळे अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी जामीन मागितला ती कोणतीही कारणं लक्षात घेऊ शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं. मुलगा अल्पवयीन असल्याने वडिलांची त्यांची भूमिका पार पाडली नाही. गाडीचं रजिस्ट्रेशन नाही, नंबर प्लेट नाही आणि मुलाकडे लायसन्स देखील नसतानाही त्याला गाडी चालवायला दिली. 18 वर्षे पूर्ण नसतानाही त्याला पबमध्ये दारू प्यायला पाठवलं. ज्युएनाईल अॅक्टनुसार हा गुन्हा आहे. त्यांनी मुलाला जास्तीची मोकळीक दिली, मुलावर नियंत्रण ठेवलं नाही. त्यामुळे हा अपघात झाला आणि दोघांना जीव गमवावा लागला.

जर त्या मुलाकडे लायसन्सन नसेल, 18 वर्षे नसतानाही त्याला दारू प्यायची परवानगी देणं हे पालक म्हणून विशाल अग्रवाल यांचे अपयश आहे. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे.

विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलिस कोठडी

रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अगरवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशाल अगरवाल यांनी त्यांच्या मुलाला विना नंबर प्लेट गाडी चालवायला का दिली? वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाचा खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले? या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती.

विशाल अगरवाल याच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना सुद्धा पुणे सत्र न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.

VIDEO Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवालला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी, पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget