एक्स्प्लोर

Pune Sinhagad Fort Rain News: 16 जुलैपर्यंत सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवा; वनविभागाचं जिल्हाप्रशासनाला पत्र

सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला खडक कोसळण्याच्या भितीने  पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली.

Pune Sinhagad Fort Rain News: पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला खडक कोसळण्याच्या भितीने  पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

घाट परिसरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आम्ही अधिक स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे, विशेषत: वीकेंडला जेव्हा हजारो पर्यटक असतात. या व्यतिरिक्त, प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही या स्थानांवर अतिरिक्त सावधगिरीची चिन्हे ठेवत आहोत.  किल्ल्याकडे जाणार्‍या घाट विभागात किमान आठ ठिकाणी खडक पडण्याची शक्यता आहे.दरवर्षी अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना जीव गमवावा लागतो. काही दिवसांपुर्वीच कल्याण दरवाज्याजवळ दरड कोसळली होती. त्यात एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाला होता.
 
पुणेकरांचा हक्काचा असलेला सिंहगड किल्यावर पावसाळ्यात आणि इतर ऋतूत देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. या सिंहगडावर विकेंडला मोठी वाहतुक कोंडी बघायला मिळते. पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी दुप्पट असते. त्यामुळे अति प्रमाणात वाहतुक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागतो. याच सिंहगडावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडतात. त्यामुळे घाटावर अनेक ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. सुरक्षेची संपुर्ण काळजी घेतली जाते. मात्र तरीही दरवर्षी दरड कोसळ्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे वनविभागाने काही दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्याची विनंती केली आहे,

गर्दी नियंत्रणासाठी 25 वनरक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र अनेकांना नियंत्रणात ठेवण्यात त्यांना त्रास होत आहे. सेल्फी घेण्यासाठी लोक धोकादायक ठिकाणी उभे असतात. त्यांना त्यांच्या सुरक्षेची चिंता आहे. पर्यटकांनी देखील स्वत:ची सुरक्षा बाळगायला हवी. गर्दी करु नये, सतर्कता बाळगायला हवी, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. पुण्यात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे त्यामुळे अति पावसाची शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Navale Exclusive  : भाजपाने  कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी  यांचा बळी दिला
Suresh Navale Exclusive : भाजपाने कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी यांचा बळी दिला
'भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय',  शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप
'भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय', शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
DC vs GT: दिल्लीचा रेकॉर्डब्रेक विजय, रिषभ पंतचा आनंद गगनात मावेना, मॅच संपताच यशाचं सिक्रेट फोडलं
दिल्लीची गुजरात मोहीम फत्ते, रिषभ पंतची टीम विजयाच्या ट्रॅकवर, मॅच संपताचं सगळं सांगून टाकलं..
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 April 2024 : ABP MajhaAjit Pawar : आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये याची मी खबरदारी घेतो - अजित पवारSuresh Navale Exclusive  : भाजपाने  कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी  यांचा बळी दिलाMahayuti : महायुतीतील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी लोकसभा प्रभारी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Navale Exclusive  : भाजपाने  कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी  यांचा बळी दिला
Suresh Navale Exclusive : भाजपाने कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी यांचा बळी दिला
'भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय',  शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप
'भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय', शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
DC vs GT: दिल्लीचा रेकॉर्डब्रेक विजय, रिषभ पंतचा आनंद गगनात मावेना, मॅच संपताच यशाचं सिक्रेट फोडलं
दिल्लीची गुजरात मोहीम फत्ते, रिषभ पंतची टीम विजयाच्या ट्रॅकवर, मॅच संपताचं सगळं सांगून टाकलं..
Lok Sabha Election : शिर्डीत तिरंगी लढतीचं वारं, काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते तातडीनं वंचितमध्ये, शिंदे अन् ठाकरेंचं टेन्शन वाढणार, मविआला धक्का
उत्कर्षा रुपवतेंनी निवडली नवी वाट, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये दाखल, शिर्डीतून लढण्याची शक्यता
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
Sangli Accident: सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
Embed widget