एक्स्प्लोर
मला रुपयाही नको, सगळी संपत्ती जप्त करा, तेलगीच्या पत्नीचा अर्ज
मात्र कर्नाटकमधील नऊ मालमत्ता अजूनही तेलगीची पत्नी शहिदा आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे आहेत. यामध्ये मोकळ्या शेतजमिनी, कमर्शियल कॉम्पलेक्स, फ्लॅट्स यांचा समावेश आहे.
पुणे : बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीची पत्नी शाहिदाने तिच्या ताब्यात असलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या नऊ मालमत्ता सरकारजमा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसा अर्जही शाहिदाने वकिलांमार्फत पुणे सत्र न्यायालयात दाखल केला आहे.
बनावट स्टॅम्प घोटाळ्याचा तपास करताना सीबीआयने तेलगीच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या. मात्र कर्नाटकमधील नऊ मालमत्ता अजूनही तेलगीची पत्नी शहिदा आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे आहेत. यामध्ये मोकळ्या शेतजमिनी, कमर्शियल कॉम्पलेक्स, फ्लॅट्स यांचा समावेश आहे.
स्टॅम्प घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू
तेलगीला सना नावाची एक मुलगीही आहे. परंतु स्टॅम्प घोटाळ्यातून कमावलेली मालमत्ता आपल्या कुटुंबाला नको, असं शाहिदाचं म्हणणं आहे. सीबीआयने या नऊ मालमत्ता जप्त कराव्यात आणि पुढे त्या सरकारजमा कराव्यात, असं शाहिदाने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे.
अब्दुल करीम तेलगीचा काही दिवसांपूर्वी तुरुंगात मृत्यू झाला. तेलगीची पत्नी शाहिदाही गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या आजरांनी ग्रस्त आहे. आपल्या हयातीतीच स्टॅम्प घोटाळ्यातून कमावलेली सर्व मालमत्ता सरकारजमा व्हावी अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.
स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल तेलगीची प्रकृती खालावली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement