एक्स्प्लोर

"....तर अजित पवार पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ करतो, अशी बदनामी झाली असती" : अजित पवार

"एकदा का जनतेला समजलं की, या पंपावर गडबड करून लूट केली जाते, मग तो पंप ओस पडलाच म्हणून समजा." असं सूचक वक्तव्यही अजित पवार यांनी यावेळी केलं.

पुणे : पेट्रोल-डिझेलमध्ये होणाऱ्या भेसळीमुळे बदनामी होते. त्यामुळे पंप चालवायला घाबरत होतो, अशी कबुली दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. ही बदनामी टाळण्यासाठीच लोणीकंद येथील पंप दुसऱ्यांना चालवायला दिला होता, असा खुलासाही अजित पवारांनी केला आहे. पुण्यातील खेड तालुक्यात खाजगी पेट्रोल पपंच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले की, "मी लोणीकंदला पंप टाकला, त्या काळात मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ व्हायची. मग माझ्या नावावर पंप आहे, म्हटल्यावर अजित पवारचं भेसळ करतोय, अशी माझी बदनामी व्हायची. त्यामुळे तो पेट्रोल पंप मी बांदलांना चालवायला दिला. साखर कारखान्यांमधील पेट्रोल पंप कारखान्यामार्फत चालवतो."

अजित पवार पुढे बोलाता म्हणाले की, "बारामतीमध्ये खरेदी-विक्री संघ, दूध संघ आणि मार्केट कमिटीचे असे अनेक पंप चालवले जातात. या ठिकाणी कोणतीही भेसळ होणार नाही, असा विश्वास तिथं मोठ्या संख्येने येणाऱ्या ग्राहकांना असतो. पण आता भेसळीचे प्रमाण जवळपास संपुष्टात आलंय. पेट्रोल-डिझेलचे टँकर जिथून भरून निघतात तिथपासून ते पंपावर येईपर्यंत प्रत्येक मिनिटाला अगदी बारकाईने लक्ष ठेवले जाते. या टेक्नॉलॉजीमुळं भेसळ बंद झालीये, पण काही पंपांवर आता चिप बदलली जाते. त्यातून पेट्रोल-डिझेलची चोरी केली जाते. पण असले धंदे फार काळ टिकत नाहीत."

"एकदा का जनतेला समजलं की, या पंपावर गडबड करून लूट केली जाते, मग तो पंप ओस पडलाच म्हणून समजा." असं सूचक वक्तव्यही अजित पवार यांनी यावेळी केलं. अजित पवारांना या विधानातून नेमकं काय सुचवायचं होतं, तसेच त्यांचा नेमका रोख कोणाकडे होता, असा चर्चाही यावेळी उपस्थितांमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, ज्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन अजित पवार यांनी केलं त्या नव्या पंपावर, असं काहीही घडणार नाही, अशी अपेक्षाही यावेळी अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडेElection Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
Embed widget