'कसाही व्यायाम करून चालत नाही, अति व्यायाम वर घेऊन जातो' : अजित पवार
Ajit Pawar Live News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar News) हे आपल्या बेधडकपणा आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. अजित दादांनी आता व्यायाम कसा करावा याचा सल्ला दिला आहे.
Ajit Pawar Live News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar News) हे आपल्या बेधडकपणा आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. आरोग्याची काळजी घेण्याबाबत देखील ते नेहमीच सल्ले देत असतात. मास्क वापरण्याबाबत नेहमीच आग्रही असणाऱ्या अजित दादांनी आता व्यायाम कसा करावा याचा सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले की, मैदानी खेळांनी शरीर चांगलं राहतं. गेले दोन वर्षे कोरोनामुळे व्यायाम करता आला नाही, कसाही व्यायाम करून चालत नाही, अति व्यायाम देखील वर घेऊन जातो. त्यामुळे ट्रेनरच्या मदतीनं व्यायाम करा, असं ते म्हणाले. त्यांनी म्हटलं की, अगोदर लोक म्हणायचे सकाळी लवकर लोक येत नाहीत. पण सवय लावेल तसे लोक वागतात,चांगली सवय लावू,निर्व्यसनी राहू, असा सल्लाही त्यांनी दिला.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर बोलताना ते म्हणाले की, आता परत कोरोना वाढतोय. इथं पण बघा बसलेल्या भगिनींनी मास्क घातला आहे. स्टेजवर फक्त एक जणांनी मास्क घातला आहे बाकी कोणीच घातला नाही,सगळे सांगतात मास्क घाला,मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय,परत कोरोना येतोय,अजून कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नाही. कोरोनाची टेस्टिंग कमी आहे. सर्वांनी लस घ्यावी, बुस्टर डोस घ्यावा. राज ठाकरे, सोनिया गांधी यांना कोरोना झाला आहे. राज ठाकरे यांचं ऑपरेशन होत त्यावेळी त्यांना कळलं. कोरोना गेला नाही काळजी घ्यायला हवी, असं अजित पवार म्हणाले.
रस्त्यावर कचरा टाकण्यावरुन बोलताना अजित पवार म्हणाले की, पुणेकर, मुंढवाकर रस्त्यावर कचरा कशाला टाकता. स्वतःच घर साफ अन् बाहेर कचरा. यावर कठोर भूमिका घ्यायला लावू नका. कारण कचऱ्यामुळे घाण होते अन् रोगराई वाढते असं ते म्हणाले.
कै चंचलाताई कोद्रे जिम्नॅशियम उद्घाटन
यावेळी अजित पवारांच्या हस्ते कै चंचलाताई कोद्रे जिम्नॅशियमचं उद्घाटन झालं. अजित पवार म्हणाले की, दुर्दैवाने चंचला आपल्यातून निघून गेली. अन् आपल्याला तिच्या नावाने हे उभं करावं लागलं. पोटतिडकीने काम करायची, अशा शब्दात त्यांच्या कामाच्या आठवणी अजित पवारांनी सांगितल्या. अजित पवार म्हणाले की, महापालिका मुदत संपली आहेत. निवडणुका पुढे गेल्या आहेत. आता ओबीसी प्रश्न आहे पण ओबीसी घटकांना त्यांच्या त्याच्या परी त्यांना हक्क मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. 50 टक्के पुढे न जाता कोर्टाचं पालन करून मध्यप्रदेश धर्तीवर करण्याचा प्रयत्न करू, असं ते म्हणाले.
एक सायन्स पार्क करायचं आहे
अजित पवारांनी सांगितलं की, केंद्र राज्य सरकार यांची एक योजना माझ्या मनात आहे. एक सायन्स पार्क करायचं होतं,पण जागा हवी होती. पिंपरी चिंचवडमध्ये 5 एकर जागा होती पण त्याला अडचणी होती. ते अजून पण डोक्यात आहे सायन्स पार्क करायचं असं ते म्हणाले.
मी वर वर बोलणार कार्यकर्ता नाही
अजित पवारांनी सांगितलं की, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी जे उमेदवार देतील ते मान्य असतील. मी वर वर बोलणार कार्यकर्ता नाही. जे बोलतो ते मी करतोच. पण मला सांगा आता मी सोडून इकडे कोण आलं. विरोधी पक्षातील कोण प्रश्न सोडवत आलं का? आम्ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नवीन चेहरे, महिला काही अनुभवी चेहरे देईल, पण आशीर्वाद देण्याचं निवडून देण्याचं काम तुमच्या हातात आहे.तो आशिर्वाद द्यावा तुम्ही, असं त्यांनी म्हटलं.