एक्स्प्लोर

Ajit Pawar : काहीही करा, पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करा; अजित पवारांच्या सूचना, विस्तृत अहवाल पाठवण्याचे आदेश

Pune Traffic News : पुणे शहरातील वाहतूकविषयक समस्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींची समिती तयार करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

मुंबई : शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, औद्योगिक संधींचं शहर म्हणून पुणे शहराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापुढील काळात वाहतूक कोंडीमुक्त शहर म्हणून शहराची ओळख निर्माण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येचा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात सर्वंकष आढावा घेतला.

कोणत्याही परिस्थितीत पुण्याला वाहतूक कोंडीतून सोडवा 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहर आणि परिसरातील औद्योगिक विकासामुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधींमुळे राज्याच्या विविध भागांतून पुणे शहरात नागरिक येत असतात. त्यामुळे पुणे शहराचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून मागील काही वर्षात पुणे शहराची दुपटीने वाढ झाली आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे शहरातील पायाभूत सोयीसुविधांवर कमालीचा ताण येऊन स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. पुणेकरांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून कोणत्याही परिस्थितीत सुटका झाली पाहिजे. त्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश त्यांनी दिले.

अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. सुरुवातीला कमी खर्चाच्या, कमी कालावधीत पूर्ण होणाऱ्या उपाययोजनांवर भर देण्यात येईल. त्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था सुरु करणे, रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढणे, सिग्नलची वेळ कमी करणे, सिग्नलविरहित वाहतूक व्यवस्थापन, अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, मिसिंग लिंक्स जोडणे आदी उपाययोजना कराव्यात.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विस्तृत प्रस्ताव पाठवा

पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या उपाययोजनांचा विस्तृत प्रस्ताव पाठवावा. त्याअनुषंगाने महापालिकेने पुणे ते कात्रज रस्त्यावरील नवले जंक्शन येथील अतिक्रमण हटविण्यात यावे. त्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. नवले ब्रिज, कोरेगाव पार्क, एबीसी चौक आदी ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी राबवावयाच्या उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ही समस्या सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर विकास प्राधिकरण आदी यंत्रणांनी समन्वयाने काम करत पुणेकरांची या समस्येतून सुटका करावी. त्यासाठी या यंत्रणांच्या वाहतूकविषयक तज्ज्ञ प्रतिनिधींचा समावेश असणारी समन्वय समिती स्थापन करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jai Jawan Govinda Pathak: यंदा 10 थर रचून विश्वविक्रम, जय जवान गोविंदा पथक राज ठाकरेंच्या घरी, भेटीत काय घडलं?
यंदा 10 थर रचून विश्वविक्रम, जय जवान गोविंदा पथक राज ठाकरेंच्या घरी, भेटीत काय घडलं?
Ratnagiri Crime : आधी चाकूनं गळा चिरून जन्मदात्या आईला संपवलं; नंतर स्वतःच्या हाताची नस...,रत्नागिरी हादरलं
आधी चाकूनं गळा चिरून जन्मदात्या आईला संपवलं; नंतर स्वतःच्या हाताची नस...,रत्नागिरी हादरलं
Home Loan : 25 वर्षांच्या गृहकर्जाची परतफेड 10 वर्षात कशी करायची?  35-40 लाखांचं व्याज कसं वाचवायचं? 2 पर्याय फायदेशीर ठरणार
25 वर्षांचं गृहकर्ज 10 वर्षात कसं फेडायचं, 2 पर्याय ठरतील फायदेशीर, 35-40 लाख रुपयांची बचत होणार
Manoj Jarange : आझाद मैदान का नाही? 100 टक्के आम्ही मुंबईत जाणारच, आमचे वकीलही कोर्टात जाणार,  मनोज जरांगेंचा निर्धार
100 टक्के न्यायदेवता न्याय देणार, आझाद मैदानात आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेंची ठाम भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jai Jawan Govinda Pathak: यंदा 10 थर रचून विश्वविक्रम, जय जवान गोविंदा पथक राज ठाकरेंच्या घरी, भेटीत काय घडलं?
यंदा 10 थर रचून विश्वविक्रम, जय जवान गोविंदा पथक राज ठाकरेंच्या घरी, भेटीत काय घडलं?
Ratnagiri Crime : आधी चाकूनं गळा चिरून जन्मदात्या आईला संपवलं; नंतर स्वतःच्या हाताची नस...,रत्नागिरी हादरलं
आधी चाकूनं गळा चिरून जन्मदात्या आईला संपवलं; नंतर स्वतःच्या हाताची नस...,रत्नागिरी हादरलं
Home Loan : 25 वर्षांच्या गृहकर्जाची परतफेड 10 वर्षात कशी करायची?  35-40 लाखांचं व्याज कसं वाचवायचं? 2 पर्याय फायदेशीर ठरणार
25 वर्षांचं गृहकर्ज 10 वर्षात कसं फेडायचं, 2 पर्याय ठरतील फायदेशीर, 35-40 लाख रुपयांची बचत होणार
Manoj Jarange : आझाद मैदान का नाही? 100 टक्के आम्ही मुंबईत जाणारच, आमचे वकीलही कोर्टात जाणार,  मनोज जरांगेंचा निर्धार
100 टक्के न्यायदेवता न्याय देणार, आझाद मैदानात आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेंची ठाम भूमिका
Manoj Jarange & Gunaratna Sadavarte:जरांगेंना हायकोर्टाने मनाई करताच सदावर्तेंचा एल्गार, म्हणाले, 'डंके की चोटपर आझाद मैदानात नो एन्ट्री'
जरांगेंना हायकोर्टाने मनाई करताच सदावर्तेंचा एल्गार, म्हणाले, 'डंके की चोटपर आझाद मैदानात नो एन्ट्री'
Maratha Reservation Manoj Jarange: मोठी बातमी: अंतरवाली सराटी अन् वडीगोद्रीच्या वेशीवर पोलीस बंदोबस्त वाढवला, हालचालींना वेग, OSD आणि जरांगेंचं काय ठरलं?
मोठी बातमी: अंतरवाली सराटी अन् वडीगोद्रीच्या वेशीवर पोलीस बंदोबस्त वाढवला, हालचालींना वेग, OSD आणि जरांगेंचं काय ठरलं?
Shivaji Sawant : पदासाठी नेत्याच्या मागे-पुढे करणं माझा स्वभाव नाही, माझे दोन नंबरचे धंदे नाहीत; तानाजी सावंतांचे बंधू कडाडले
पदासाठी नेत्याच्या मागे-पुढे करणं माझा स्वभाव नाही, माझे दोन नंबरचे धंदे नाहीत; तानाजी सावंतांचे बंधू कडाडले
Nashik Municipal Elections : भाजपने नाशिकमध्ये 100 प्लसचा नारा देताच काँग्रेसही मैदानात, महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार
भाजपने नाशिकमध्ये 100 प्लसचा नारा देताच काँग्रेसही मैदानात, महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार
Embed widget