एक्स्प्लोर

पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोबाबत अजित पवारांचे निर्देश; स्थानकावर लवकरच भेट

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज आढावा घेतला

मुंबई - पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (Metro) तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी (Police) चोवीस तास परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिले. मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी करण्यासाठी येत्या 26 सप्टेंबर रोजी भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज आढावा घेतला. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह मेट्रो तीनचे काम करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

तर कंपन्यांविरुद्ध कारवाई

मेट्रो लाईन तीनच्या कामात येणाऱ्या अडथळ्यासंदर्भात माहिती घेऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मेट्रोच्या कामांमुळे रस्ते खराब झाल्यास, ड्रेनेजलाईन खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. मेट्रोचे काम व त्याखालील खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मेट्रोचे काम करताना त्याखालील रस्ते, ड्रेनेजलाईनची कामे तातडीने करण्यात यावीत. ही कामे वेळेत होत नसल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येईल. 

24 तास कामाची परवागनी

बाणेर रॅम्प व पाषाण रॅम्पची कामे गतीने होण्यासाठी पोलीस विभागाने मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीस गर्डर टाकणे व इतर कामांसाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी चोवीस तास काम करण्याची परवानगी द्यावी. याकाळात वाहतूक वळविण्यात येणारे रस्ते सुस्थितीत असतील याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

हेही वाचा

मोठी बातमी! राज्यातील 14 आयटीआय चे नामांतर; महाविद्यालयांना विनायक मेटे अन् आनंद दिघेंचं नाव 

बाप रे... मुंबईच्या 'लोकल'मध्ये आढळली बेवारस बॅग; बॅगमध्ये 20 लाख कॅश, प्रवाशाचा शोध सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : चांदीने केली नात्याची माती, भावानं केली भावाची निर्घृण हत्या; कोल्हापुरातील चांदी व्यावसायिकाच्या हत्येचा अवघ्या काही तासात उलघडा
चांदीने केली नात्याची माती, भावानं केली भावाची निर्घृण हत्या; कोल्हापुरातील चांदी व्यावसायिकाच्या हत्येचा अवघ्या काही तासात उलघडा
Badlapur Encounter: बदलापूर आरोपीचा एन्काऊंटर, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं पुढं काय
बदलापूर आरोपीचा एन्काऊंटर, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं पुढं काय
ओबीसीत समावेश केलेल्या कुणबीच्या तीन पोटजाती कोणत्या?; मंत्रिमंडळ निर्णयातून समोर
ओबीसीत समावेश केलेल्या कुणबीच्या तीन पोटजाती कोणत्या?; मंत्रिमंडळ निर्णयातून समोर
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला तुमचा विरोध होता का? गिरीश महाजनांनी सांगितलं मोठं राजकारण
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला तुमचा विरोध होता का? गिरीश महाजनांनी सांगितलं मोठं राजकारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde News :  बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:गोळा झाडून घेतलीABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 23 September 2024Jalna Maratha Protest : धुळे-सोलापूर महामार्गावर मराठा बांधवांच्या रास्तारोकोमुळे वाहतूक कोंडीLaxman Hake on Sambhaji Raje Chatrapati : तुम्हाला राजे का म्हणायचं? लक्ष्मण हाकेंचा संभाजीराजेंना सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : चांदीने केली नात्याची माती, भावानं केली भावाची निर्घृण हत्या; कोल्हापुरातील चांदी व्यावसायिकाच्या हत्येचा अवघ्या काही तासात उलघडा
चांदीने केली नात्याची माती, भावानं केली भावाची निर्घृण हत्या; कोल्हापुरातील चांदी व्यावसायिकाच्या हत्येचा अवघ्या काही तासात उलघडा
Badlapur Encounter: बदलापूर आरोपीचा एन्काऊंटर, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं पुढं काय
बदलापूर आरोपीचा एन्काऊंटर, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं पुढं काय
ओबीसीत समावेश केलेल्या कुणबीच्या तीन पोटजाती कोणत्या?; मंत्रिमंडळ निर्णयातून समोर
ओबीसीत समावेश केलेल्या कुणबीच्या तीन पोटजाती कोणत्या?; मंत्रिमंडळ निर्णयातून समोर
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला तुमचा विरोध होता का? गिरीश महाजनांनी सांगितलं मोठं राजकारण
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला तुमचा विरोध होता का? गिरीश महाजनांनी सांगितलं मोठं राजकारण
Ajinkya Rahane : सरकारची घोषणा अन् अजिंक्य रहाणे झाला कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
सरकारची घोषणा अन् अजिंक्य रहाणे झाला कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Tirupati Laddu Controversy : जनावरांच्या चरबीयुक्त लाडूच्या वादानंतर तिरुपती मंदिरात देवस्थान समितीचा सर्वात मोठा निर्णय!
जनावरांच्या चरबीयुक्त लाडूच्या वादानंतर तिरुपती मंदिरात देवस्थान समितीचा सर्वात मोठा निर्णय!
Kolhapur News : दहा महिने झाले तरी तुटलेल्या ऊसाला 100 रुपयांचा निर्णय नाहीच; स्वाभिमानी शेतकरी संघटना अमित शाहांना, राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार
दहा महिने झाले तरी तुटलेल्या ऊसाला 100 रुपयांचा निर्णय नाहीच; स्वाभिमानी शेतकरी संघटना अमित शाहांना काळे झेंडे दाखवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 सप्टेंबर 2024 | सोमवार
Embed widget