Pune News : ललिल कला केंद्र नाटक प्रकरण; सत्यशोधक समितीतील नावं समविचारी; चौकशी समितीला अजित पवार गटाचा विरोध
पुण्यातील ललित कला केंद्रात नाटकावरुन झालेल्या राड्यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. याला अजिर पवार गटाने विरोध केला आहे.
![Pune News : ललिल कला केंद्र नाटक प्रकरण; सत्यशोधक समितीतील नावं समविचारी; चौकशी समितीला अजित पवार गटाचा विरोध Ajit Pawar group opposes Satyashodhak Committee set up for inquiry in lalit kala play scandal savitribaiphule pune university Pune News : ललिल कला केंद्र नाटक प्रकरण; सत्यशोधक समितीतील नावं समविचारी; चौकशी समितीला अजित पवार गटाचा विरोध](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/06/1c7b2002ef2167e7bc08578a6c757d4c1707205139513442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune News : पुण्यातील ललित कला केंद्रात नाटकावरुन (Savitribai Phule Pune University) झालेल्या राड्यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. निवृत्त जिल्हा न्यायाधिशाचे अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीला राष्ट्रवादीतर्फे विरोधही करण्यात आला आहे.
या समितीत एका विचाराचे लोक आहेत त्यांच्यासोबतच समितीमध्ये सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे ,लेखक दिग्दर्शक अतुल पेठे ,लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्यापैकी कोणत्याही दोन व्यक्तींचा समावेश किंवा तिघांचाही समावेश यामध्ये करून घेण्यात यावा, अशी आम्ही राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.
विद्यापीठ प्रशासनाने स्थापन केलेल्या या चौकशी समितीचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे हे असणार असून समितीच्या इतर सदस्यांमधे अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचाही समावेश करण्यात आलाय. चौकशी समितीच्या इतर सदस्यांमधे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते विनायक आंबेकर यांचा समावेश आहे. ही समिती एक महिन्याच्या कालावधीत चौकशी करून त्याचा अहवाल कुलगुरूंना सादर करणार आहे. त्यानंतर विद्यापीठाकडून कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीने का विरोध केला आहे?
या चौकशी समितीला राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले, पुणे युनिव्हर्सिटीने ललित कला केंद्र मध्ये झालेल्या प्रकरणाबद्दल जी सत्यशोधक समिती स्थापन केली आहे त्या समितीला राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्यावतीने विरोध केला. कारण या कमिटी मध्ये जे जे सदस्य म्हणून घेतले आहेत ते एका ठराविक विचार धारेचे आहेत, अस आमचं स्पष्ट मत आहे, ही समिती पाहिल्यानंतर लागणारा निकाल हा फक्त एका बाजूने लागू शकतो, किंवा एकच बाजू समोर येऊ शकते असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे तात्काळ या समितीमध्ये सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे ,लेखक दिग्दर्शक अतुल पेठे ,लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्यापैकी कोणत्याही दोन व्यक्तींचा समावेश किंवा तिघांचाही समावेश यामध्ये करून घेण्यात यावा अशी आम्ही राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी करीत आहोत, अशी फेसबूक पोस्ट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आली आहे.
विद्यापीठ व परिसरामध्ये शांतता राखण्याचे आवाहन
या संबंधात विद्यापीठाकडून आवश्यक त्या सर्व कार्यवाही करण्यात येत असून या संदर्भात विद्यापीठाने जाहीर प्रकटन प्रसिध्द केले आहे. विद्यार्थी, नागरिक, संस्था, संघटना व समाजातील सर्व घटकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत, विद्यापीठ व परिसरामध्ये शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विचार, मत, भावना व्यक्त करताना विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज करताना कोणताही अडथळा येणार नाही, असे जाहीर आवाहन विद्यापीठाने केले आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune Ring Road : पुणे रिंग रोडसाठी भूसंपादनाचं काम अंतिम टप्यात; 2 हजार 635 कोटींचा मोबदला वाटप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)