Ajit Pawar: तत्पर अजितदादा भूमिपुजनाला बुट काढायला विसरले? चाकणमधला व्हिडिओ आला समोर
Ajit Pawar: चाकण येथील ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीच्या भुमीपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या पायातील शुज (बुट) पायातच ठेवून तसाच नारळ फोडला आणि भूमीपूजन केलं.
पुणे: ऐरवी जे आपल्या वागण्याच्या माध्यमातून आपल्या तत्परतेतून आपलं लक्ष वेधून घेणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमीच चर्चेत असतात. आजही ते पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या एका कृतीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. चाकण येथील ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीच्या भुमीपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्या पायातील शुज (बुट) पायातच ठेवून तसाच नारळ फोडला आणि भूमीपूजन केलं. ऐरवी एखाद्या छोट्या चुकीमुळे सर्वांना फैलावर घेणाऱ्या अजित पवारांना (Ajit Pawar) मात्र नारळ फोडताना भुमिपूजनाचा टिकाव मारताना बुट काढण्याचा विसर पडला असल्याच्या चर्चा आता रंगु लागल्या आहेत.
आज चाकण येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व अधिकारी-कर्मचारी निवासस्थान इमारतींच्या भूमिपूजन समारंभाला अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. या सोहळ्यात खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण सोहळा संपन्न पार पडला. या कार्यक्रमाच्या भुमिपूजनावेळी मात्र, अजित पवार आपल्या पायातील बूट काढायला विसरल्याचं दिसून आलं आहे. मात्र, अजित पवार इतर वेळी अशा कार्यक्रमामध्ये पायातील बूट काढल्याचे दिसतात.
चाकण येथील ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीच्या भुमीपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या पायातील शुज (बुट) पायातच ठेवून तसाच नारळ फोडला आणि भूमीपूजन केलं. pic.twitter.com/oZVedkDzUH
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 12, 2024
भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ
भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो, भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका, अस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.तसेच दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, असे आश्वासन देखील दिले. अजित पवार खेड-आळंदी विधानसभा दौऱ्यावर आहेत. या वेळी ते मेळाव्यात बोलत होते.
चाकण येथील ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीच्या भुमीपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या पायातील शुज (बुट) पायातच ठेवून तसाच नारळ फोडला आणि भूमीपूजन केलं. pic.twitter.com/oZVedkDzUH
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 12, 2024
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले,भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो, भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका. काही दिवस आम्हाला द्या, चुकलो तर आमचं कान पकडून जाब विचारा. तुमचा तो अधिकार आहे. मात्र भावनिक होऊन काही वेगळा निर्णय घेऊ नका. तुमचा आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.
लोकसभेला जे झालं ते गंगेला मिळालं, पण आता... : अजित पवार
आरक्षण मला काढायचं आहे, असं राहुल गांधी परदेशात जाऊन बोलले. म्हणजे यांनी बोलायचं अन् पावती आमच्यावर फाडायच्या हे लक्षात घ्या ना, जनतेला आवाहन आहे. लोकसभेला जे झालं ते गंगेला मिळालं, पण आता विधानसभेला आम्हाला आशीर्वाद द्या, असेही आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.