एक्स्प्लोर
खेड शिवापूर टोलनाका हटाव आंदोलनाला यश; पुणे-पिंपरीतील गाड्यांना टोलमाफ
खेड-शिवापूर टोलनाका बंद करण्यासाठी आज जोरदार आंदोलन करण्यात आले. यानंतर प्रशासनाने काही मागण्या मांन्य केल्याचं लेखी दिल्यानंतर आंदोलन घेण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली.
पुणे : खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या आंदोलनाला यश आलंय. टोल प्रशासनाने कृती समितीच्या काही मागण्या मान्य केल्याचं लेखी दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आलंय. आठ दिवसांसाठी भोर, वेल्ला, मुळशी, खडकवासला, हवेली, पुरंदर आणि पुणे भागातील वाहने मोफत सोडण्याचं आश्वासन देण्यात आले. पुढील आठ दिवसांसाठी टोल प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पुण्याहून सातार्याला जाताना दोन मार्गिका आणि साताऱ्यावरुन पुण्याला येताना दोन मार्गिका उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बरोबर बैठक घेण्यात येणार आहे. खासदार सुप्रिया सुळे, समितीचे पदाधिकारी, आमदार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर टोलनाका पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर हटवण्यावर निर्णय होणार आहे. तोपर्यंत मोफत वाहने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला पहिल्या टप्प्यात यश आल्याचं सांगितलं. तर कृती समितीने टोलनाका पीएमआरडीएच्या बाहेर हटवा ही मुख्य मागणी कायम आहे. ही पेंडिंग असून अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र, टोलनाका हटत नाही तोपर्यंत वाहने मोफत सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समितीनं म्हटलंय. त्याचबरोबर टोलनाका हटला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे पत्र तयार आहे. सरकारनं न्याय दिला नाही तर न्यायालयात जाणार असल्याचं कृती समितीने इशारा दिला.
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर प्रवाशांची फसवणूक, फास्टटॅगच्या माध्यमातून डबल टोल वसूली
सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती -
पुणे सातारा रोडवर खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितर्फे येत्या 16 फेब्रुवारीला सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. यात खासदार सुप्रिया सुळे, आमदार भिमराव तापकीर, संग्राम थोपटे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. काम अपूर्ण असल्यामुळे ही टोलवसुली एक जानेवारी 2014 पासून बंद व्हायला हवी होती. मात्र, ती सुरू ठेवून गेल्या 9 वर्षांत तब्बल 1780 कोटी रुपयांची लूट ठेकेदारानं केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मार्च 2013 पर्यंत या रस्त्याला सहा पदरी करण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण 2020 उजाडल्या नंतरही हे काम प्रलंबित आहे. या सर्व प्रकरणात सीबीआयकडे 100 पानी फिर्याद दाखल केली आहे. सामान्य पुणेकरांना या टोलनाक्याचा त्रास होत आहे. या भागात विविध तीर्थक्षेत्र आहेत.
Pune | खेड-शिवापूर टोलनाक्यावरील कृती समितीचं आंदोलन 3 तासांनी मागे | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement