एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2022: अखेर वादात सापडलेल्या 'अफझल खानाचा वध' या देखाव्याला पोलिसांची परवानगी; मंडळाच्या प्रयत्नांना यश

अफझल खानाचा वध या जिवंत देखाव्याला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं नकाराचं कारण देण्यात आलं होतं. मात्र आता याच देखाव्याला पोलिसांनी परवानगी दिली आहे.

Pune Ganeshotsav 2022:  पुण्यातील एका गणपती मंडळाच्या जिवंत देखाव्यावरुन वाद पेटला होता. अफझल खानाचा वध या जिवंत देखाव्याला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं नकाराचं कारण देण्यात आलं होतं. मात्र आता याच देखाव्याला पोलिसांनी परवानगी दिली आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास भारतात नाहीतर पाकिस्तानात दाखवायचा का? असा प्रश्न मंडळाकडून निर्माण करण्यात आला होता. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे या संदर्भात मेलद्वारे संपर्क करुन निवेदन पाठवलं होतं. अखेर मंडळाच्या या प्रयत्नांना यश आलं आहे.

सध्या पुण्यात ब्राह्मण महासंघ अनेक प्रश्नांच्या बाबतीत चांगलंच सक्रिय झालं आहे. या देखाव्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी देखील आज कोथरुड पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिलं होतं. या देखाव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता होती. अनेक स्तरावर या देखाव्यासंदर्भात बोललं गेलं होतं. मात्र आता हे गणपती मंडळ अफझल खानाचा वध हा जिवंत देखावा साकारणार असल्याचं, मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी सांगितलं आहे. 

आदित्य ठाकरेंनीदेखील प्रश्न उपस्थित केला होता.
शिंदे फडणवीसांचं तत्पुर्त असलेल्या सरकारकडून वारंवार हिन्दूत्ववादी सरकार असल्याचं भाष्य केलं जात होतं. याच सरकारमध्ये जर शिवरायांच्या प्रतापाचा इतिहास दाखवण्यासाठी विरोध होत असेल तर  ही गोष्ट फार चिंताजनक आहे. स्वत:ला हिन्दूत्ववादी म्हणता मग महाराजांचा इतिहास दाखवायला विरोध का करता?, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

नक्की काय होतं प्रकरण?
पुण्यातील कोथरुडमधील संगम चौकातील गणपती मंडळ उत्तम आणि क्रिएटीव्ह देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाने 'अफझल खान वध' हा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या देखाव्याला पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत या मंडळाला संबंधित देखावा उभारण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे मंडळाने नाराजी व्यक्त केली होती. देखाव्या वरुन कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार असेल तर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता होती. पुण्यात दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने होणार असल्याने मंडळाचे कार्यकर्ते उत्साहात होते मात्र पोलिसांकडून काही निर्णय नाकारण्यात आल्याने मंडळांमध्ये नाराजीचा होता.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Embed widget