Sharad Pawar : तब्बल 24 वर्षानंतर प्रथमच शरद पवार पुण्याच्या 'काँग्रेस भवन'मध्ये जाणार
Sharad Pawar : तब्बल 24 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये जाणार आहेत.
Sharad Pawar : तब्बल 24 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये (Pune Congress Bhavan) जाणार आहेत. आज काँग्रेसचा 138 वा स्थापना दिवस आहे. या दिनानिमित्त देशभरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. स्थापना दिनानिमित्त पुणे काँग्रेसच्या वतीनं देखील कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. काँग्रेस पक्षाकडून सर्व पक्षातील नेत्यांना कॉंग्रेस पक्ष कार्यालयात चहापाणाला आमंत्रित करण्यात आलं आहे. शरद पवार यांनी देखील आमंत्रण दिलं असून, त्यांनी ते स्वीकारलं आहे. आज संध्याकाळी सात वाजता ते पुण्यातील काँग्रेस भवनला भेट देणार आहेत.
काँग्रेस भवनमध्ये आत्तापर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे
शरद पवार यांची राजकीय कारकिर्द ही काँग्रेस पक्षापासूनच सुरु झाली. काँग्रेसचे एक दिग्गज नेते म्हणून शरद पवार यांची ओळख होती. काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांनी विविध पद भूषवली. चार वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील झाले. तसेच काँग्रेसमध्ये असतानाच केंद्रात विविध मंत्रीपदावर देखील शरद पवार यांनी काम केलं. त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर म्हणजे जवपास 24 वर्षानंतर शरद पवार हे प्रथम पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये जाणार आहेत. पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचा आत्तापर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे. एक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यामाध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वाटचालीची माहिती देण्यात आली आहे. या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसकडून देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जात आहे. त्याचप्रमाणं पुण्यातही कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप, शिवसेना, मनसेचे पदाधिकारीही येणार
काँग्रेस पक्षाच्या वतीनं दरवर्षी पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन केलं जाते. पुणे शहराची एक वेगळी संस्कृती आहे. स्थापना दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह सर्वच स्तरातील व्यक्तींना आमंत्रीत करत असतो अशी माहिती काँग्रेसच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी मी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यांना येण्याचं आमंत्रण दिलं होतं. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं असून आज ते काँग्रेस भवनमध्ये येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे यांनी दिली. त्यांच्याबरोबर शाहू छत्रपती हे देखील येणार आहेत. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे देखील येणारक असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. भाजप, शिवसेना, मनसे, एमआयएमचे नेते देखील काँग्रेस भवनमध्ये येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
Goodbye 2022 : वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपच भूकंप! अशा राजकीय घडामोडी घडल्या की अनेकांची झोपच उडाली...