एक्स्प्लोर

Goodbye 2022 : वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपच भूकंप! अशा राजकीय घडामोडी घडल्या की अनेकांची झोपच उडाली...

2022 IMP Political News: राजकीय घडामोडी म्हटलं की गावखेड्यापासून ते शहरातील कार्पोरेट ऑफिसेसपर्यंत चर्चा आणि गप्पांना कमीच नसते.2022 सालात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घटना घडून गेल्या.

Maharashtra Political Update: डिसेंबर महिना सुरु झाला की आपण वर्षभरात घडलेल्या घटनांचा एक आढावा घेत असतो. पुढच्या वर्षी काय यासह या वर्षात महत्वाचं काय घडून गेलं हे देखील महत्वाचं असतं. यात राजकीय घडामोडी म्हटलं की गावखेड्यापासून ते शहरातील कार्पोरेट ऑफिसेसपर्यंत चर्चा आणि गप्पांना कमीच नसते. 2022 सालात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घटना घडून गेल्या. या घटनांनी राजकारणात भूकंपच आले. 

महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 सालात घडलेल्या महत्वाच्या घटनांबाबत आपण जाणून घेऊयात... 


संजय राऊतांना 100 दिवसांची जेलवारी (Shiv sena Mp sanjay Raut News)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जेलमध्ये जावे लागले होते. त्यांना 9 नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. 31 जुलै 2022 रोजी सकाळी सात वाजताच ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना चार वाजता ईडीने ताब्यात घेतले आणि नंतर रात्री 11.38 मिनिटांनी संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.  संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच गेली. राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने 2 नोव्हेंबर रोजी लेखी उत्तर सादर केले. त्यानंतर जामिनावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी 9 नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने  9 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांच्या जामीनावर सुनावणी घेत त्यांना जामीन मंजूर केला. संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनंतर जामीन मंजूर करण्यात आला. 

100 कोटींचं प्रकरण अन् अनिल देशमुखांना अटक (Anil Deshmukh Latest updates)

महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली. कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणातईडीनं अनिल देशमुख यांना अटक केली. जवळपास दोन महिने नॉट रिचेबल असलेले अनिल देशमुख  स्वतःहून ईडी कार्यालयात दाखल झाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप लावले होते. महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटकाच होता.  1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. परंतु, सीबीआयच्या विरोधानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी म्हणजे 22 डिसेंबरपर्यंतल जामीनाला स्थगिती दिली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत ही स्थगिती 27 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला.

नवाब मलिक सरकारमध्ये मंत्री असतानाच जेलमध्ये (NCP Nawab Malik news)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे मंत्री असतानाच जेलमध्ये गेले. नवाब मलिक यांना ईडीनं (ED) गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक केली होती. नवाब मलिक यांना ईडीनं (ED) गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या व्यवहारातून दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याचा आरोपही मलिकांवर करण्यात आला आहे. हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. गोवावाला कंपाउंडमधील जमीन ही कायदेशीर मार्गाने खरेदी केली असल्याचा दावा त्यांनी केला. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळालेला नाही.  

विधानपरिषद निवडणुकीतही एक अधिकची जागा भाजपनं खेचून आणली (Vidhan Parishad Election)

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 10 जागांची अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. भाजपला चार जागा मिळतील असा अंदाज होता. मात्र भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड देखील या निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक पद्धतीनं विजयी झाले. काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची तीन मतं फुटली. या निवडणुकीत रामराजे निंबाळकर,  एकनाथ खडसे, आमश्या पाडवी, सचिन अहिर, प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड, भाई जगताप हे दहा उमेदवार विजयी झाले.  

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिकांचा अनपेक्षित विजय (Rajya Sabha Election News)

हायव्होल्टेज ड्राम्यानंतर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल हाती आला अन् शिवसेनेची हक्काची आणि हातातली एक जागा भाजपनं जिंकली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3  उमेदवारांचा विजय झाला. यात शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा  विजय झाला. तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांनीही विजयाचा गुलाल उधळला. राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. यात धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात होते. यातील सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्यात चुरस होती. बऱ्याच घडामोडीनंतर पहाटे पावणेचार वाजता महाडिकांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. 

एकनाथ शिंदेंचं बंड अन् शिवसेनेत मोठा भूकंप (CM Eknath shinde latest News)

राज्यसभा निवडणुकीच्या रात्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांच्या साथीनं शिवसेनेतून फारकत घेतली. 40 आमदारांना सोबत घेत शिंदेंनी गुजरातमार्गे सुरत गुवाहाटी गाठले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात परत येत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असतील अशी दाट शक्यता असतानाच अचानक त्यांनीच एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार अशी घोषणा केली अन् महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस सत्तेतून बाहेर राहणार होते, पण पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आमदारांनंतर शिवसेनेचे 13 खासदार देखील शिंदे गटात गेले.

 उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा अन् धनुष्यबाण चिन्हही गेलं (Uddhav Thackeray and shiv sena news)
एकनाथ शिंदेंचं हे बंड हा उद्धव ठाकरेंसाठी निश्चितच मोठा धक्का होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. पक्षातील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागले. शिवसेना पक्षातील 40 आमदार आणि 13 खासदारांनी वेगळा गट तयार करत उद्धव ठाकरेंना धक्का दिला. शिवसेना कुणाची? हा वाद सध्या कोर्टात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात सर्वात जास्त हा विषय चर्चेत राहिलाय. यानंतर दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. कोर्टानं यावर निर्णय देताना हे चिन्हच गोठवलं. यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटानं बाजी मारली आणि पोटनिवडणूक जिंकली. 

  
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Gram Panchayat Election updates)
या वर्षात राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीसह हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात आम्हीच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा प्रत्येक गटाकडून करण्यात आला. नुकत्याच सात हजारांहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा पार पडला. राज्यातील महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका मात्र या वर्षीच्या पेंडिंगच राहिल्या आहेत. मुंबईसह राज्यातील अन्य अनेक महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सध्या या पालिकांवर प्रशासक कार्यरत आहेत. पुढच्या वर्षात या महापालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला (Maharashtra Karnataka Border issue)
2022 सालच्या अंतिम टप्प्याकडे येताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चर्चेत आला. सांगलीतील जतमधील काही गावांनी पाण्याच्या मुद्द्यावरुन कर्नाटकात जाण्याची भावना बोलून दाखवली आणि रान पेटलं. मग तिकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बोंबाबोंब सुरु झाली. ट्विटरवरुन त्यांनी सोलापूर, अक्कलकोटसह आणि काही भाग कर्नाटकात देण्याची मागणी केली. यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनीही त्यांना दणकावून उत्तर दिलं. भाजप नेते देखील आक्रमक झाले. शेवटी हा मुद्दा केंद्रात पोहोचला. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक अमित शाहांनी बोलावली आणि एक समन्वय समिती गठित करुन या मुद्द्यावर शांततापूर्ण पद्धतीनं तोडगा काढण्याबाबत सांगितलं. तरीही या मुद्द्यावरुन संघर्ष कायम आहे. सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्याचा जोर आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 5PM 25 March 2025Ajit Pawar vs Narayan Kuche :भाजप आमदाराचा प्रश्न,दादांचा पारा चढला;विधानसभेत नारायण कुचेंना भरला दमVinod Kamra New Song : हम होंगे कंगाल.., कुणाल कामराकडून नवा व्हिडीओ पोस्ट, शिवसेनेच्या नेत्यांची सडकून टीकाAnil Parab Full Speech : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी..ठाकरे गालातल्या गालात हसले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Embed widget