Pimpri News : 'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
Pune News : काळेवाडीच्या पवारनगरमध्ये मशीद नव्हे, तर मदरसा असल्याचं समोर आलं. झालेली कारवाई ही मदरशाच्या वाढीव अनधिकृत बांधकामावर झाल्याचं दिसून आलं आहे.
Pune News : पिंपरी चिंचवडमधील मशिदीवर खरंच कारवाई झाली का? झाली, तर मग कोणत्या अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली? नेमकी वस्तुस्थिती काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने प्रत्यक्ष कारवाईस्थळी जाऊन आढावा घेतला. तेव्हा काळेवाडीच्या पवारनगरमध्ये मशीद नव्हे, तर मदरसा असल्याचं समोर आलं. झालेली कारवाई ही मदरशाच्या वाढीव अनधिकृत बांधकामावर झाल्याचं दिसून आलं आहे.
विनापरवाना बांधकाम असल्यानं पालिकेने दोनदा नोटीस धाडली
2001 साली दुमजली मदरसा उभारण्यात आला. काही महिन्यांनी त्यासमोर चारही बाजूनी कच्चा भिंती अन त्यावर पत्रा असं बांधकाम करण्यात आलं होतं. मात्र त्याच जागेवर काही दिवसांपासून पिलर टाकून स्लॅब टाकण्यात आलं. हे विनापरवाना बांधकाम असल्यानं पालिकेने दोनदा नोटीस धाडली होती. त्यानंतर रात्रीत कारवाईचा बडगा उगारला. जे अन्यायकारक असल्याचं मत मदरशाच्या ट्रस्टीनी व्यक्त केला. आमच्यासोबत लगतच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई का नाही झाली, असा प्रश्न ट्रस्टीने उपस्थित केला. मात्र आता जे झालं ते झालं, आता समाजाने शांतता राखावी, असं आवाहनही ट्रस्टीने केलं आहे.
मशीद अथवा मदरश्यावर नव्हे तर नव्यानं बांधण्यात आलेल्या हॉलवर कारवाई
दरम्यान, पिंपरी चिंचवडच्या पवारनगर येथील मशिदीवर अथवा मदरश्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तर नव्यानं बांधण्यात आलेल्या अनधिकृत हॉल वर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पालिकेने केलेलं आहे. पालिकेचे अधिकारी किरण गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या