बस प्रवासात ओळख झालेल्या महिलेने चार महिन्याचे बाळ पळवले, 22 वर्षीय महिलेचा शोध सुरु
महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. आणि याच भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीने चार महिन्याचा बाळाला घेऊन घर सोडले होते.

पुणे : अहमदनगर ते सातारा या मार्गावरील बस प्रवासादरम्यान झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका महिलेने चार महिन्यांच्या बाळाचं अपहरण केले. पुण्याचा हडपसर परिसरात हा प्रकार घडला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल करतात आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे. 23 वर्षीय महिलेने या प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. आणि याच भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीने चार महिन्याचा बाळाला घेऊन घर सोडले होते. लोणी गावातील असलेली ही महिला नगरला गेली. त्यानंतर तिने नगर ते सातारा बसने प्रवास सुरू केला. त्याचवेळी एक महिला त्यांच्या शेजारी सीटवर येऊन बसली. काही वेळाने महिलेने फिर्यादी यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या.
स्वारगेट बस स्थानकात उतरल्यानंतर या दोघीही हडपसर परिसरात आल्या. तेथील एका चायनीजच्या दुकानात दोघींनी जेवण केले. त्यानंतर आरोपी महिलेने बाळाला खाऊ आणण्याचा बहाण्याने फिर्यादी महिलेकडून स्वतःजवळ घेतले आणि ती तिथून गेली ती परत आलीच नाही. बराच वेळ झाल्यानंतर फिर्यादी महिलेने आजूबाजूच्या परिसरात त्या महिलेचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरू केला. अद्याप तिचा शोध लागला नसून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके






















