एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे जिल्ह्यातून 30 ट्रेन अन् 2 हजार बसेसमधून तब्बल 80 हजार नागरिक स्वगृही
लॉकडाऊनच्या काळात पुणे जिल्ह्यातील विविध भागात अडकलेले 80 हजार नागरिक 30 ट्रेन आणि 2 हजार बसेसमधून स्वगृही परतले आहेत.
पुणे : पुणे जिल्ह्यात रांजणगाव, चाकण, भोसरी, पिंपरी-चिंचवड, पिरंगुट, शिक्रापूर या भागात अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये लाखो मजूर काम करतात. लॉकडाऊनमुळे या सर्व कंपन्या बंद आहेत. परिणामी येथे काम करणाऱ्या मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यात कोरोना व्हायरसचा धसका. यामुळे त्रस्त झालेल्या मजुरांनी दुसरा लॉकडाऊन संपताच मिळेल त्या वाहनाने अन्यथा पायीच गावाचा रस्ता धरला. दुसरा लॉकडाऊन संपताच सरकारनेही या मजुरांना गावी जाण्यासाठीची व्यवस्था केली. ट्रेन आणि बसमधून या मजुरांना आपापल्या राज्यात गावात नेऊन सोडले.
पुणे जिल्हा प्रशासनाने 18 मे अखेर महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील 80 हजार नागरिकांना आपापल्या गावी नेऊन सोडले. यामध्ये मजूर, विद्यार्थी आणि इतरांचा समावेश आहे. रेल्वे विभागातर्फे सोडण्यात आलेल्या 30 'श्रमिक स्पेशल' ट्रेनने 35 हजार मजुरांना त्या त्या राज्यात सोडण्यात आले. तर 2000 बसेसमधून 45 हजार नागरिकांना आपापल्या जिल्ह्यात जाण्याची व्यवस्था करण्यात आली. घरी निघालेल्या या सर्व नागरिकांची जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. शिवाय या सर्वांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात
कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचे (सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर) पालन करण्यात आले होते. हे सर्व नियम लक्षात ठेवूनच या मजुरांना आपापल्या घरी पाठविले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. दरम्यान, पुणे जिल्ह्यात राज्यातील दोन नंबरची कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.
लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू
देशभरात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 31 मेपर्यंत हे लॉकडाऊन वाढवण्यात आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कामगार विशेष, इतर विशेष गाड्या, पार्सल सेवा आणि फक्त मालगाड्या सुरू राहणार असल्याचे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने 30 जून पर्यंत सर्व नियमित प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे यापुढील काळात राज्यात अडकलेल्या मजुरांना आपल्या घरी जाता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement