एक्स्प्लोर

Pune Bypoll election : पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवडच्या दळवी नगरमध्ये 43 लाख रुपयांची रोकड सापडली

 चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सगळीकडे काटेकोरपणे नजर ठेवण्यात येत आहे. त्यात चिंचवडच्या दळवी नगरमध्ये 43 लाख रुपयांची रोकड मिळाली आहे.

Pune Bypoll election : चिंचवड विधानसभा  (bypoll election) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सगळीकडे काटेकोरपणे नजर ठेवण्यात येत आहे. त्यात चिंचवडच्या (chinchwad bypoll election) दळवी नगरमध्ये 43 लाख रुपयांची रोकड (Cash) मिळाली आहे. ही रोकड नेमकी कशासाठी वापरली जाणार होती? किंवा कोणासाठी वापरली जाणार होती. हे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही मात्र चालकाकडून चौकशीत समाधान कारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांना बोलवत कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे शहरात कोणतेही अवैध कार्य होऊ नये यासाठी खबरदारी बाळगली जात आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाचे अधिकारी तपासणी करत होते. त्यावेळी एका कारमध्ये 43 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. एवढंच नाही तर गाडीमध्ये धारदार हत्यारे सापडली असून कार चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे.

चालकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कारवाई

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाचे अधिकारी तपासणी करत होते. त्यावेळी एका कारमध्ये त्यांना 43 लाख रुपयांचं घबाड हाती लागलं. यावेळी त्यांनी चालकाची चौकशी केली. विचारपूस केली मात्र या 43 लाख रुपयांसंदर्भात चालकाने दिलेले उत्तर पोलिसांना आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सामाधानकारक न वाटल्याने ही कारवाई केली आहे.

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाडाझडती

पुण्यात पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे शहरात दोन्ही मतदारसंघात झाडाझडती घेतली जात आहे. त्यातच अनेक परिसराची पाहणीदेखील केली जात आहे. हीच झाडाझडती सुरु असताना हे 43 लाखांचं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे.

तक्रार करण्यासाठी नागरिकांना अॅपची सुविधा

येत्या 26 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदारसंघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेमुळे अवैध बाबींवर तक्रार आणि कारवाई करणं सोपं होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nepal Protest: नेपाळ हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीद दर्जा; पीडितांना 10 लाखांची भरपाई, अंतरिम पंतप्रधान म्हणाले सहा महिन्यांत निवडणूक घेत सत्ता सोडणार
नेपाळ हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीद दर्जा; पीडितांना 10 लाखांची भरपाई, अंतरिम पंतप्रधान म्हणाले सहा महिन्यांत निवडणूक घेत सत्ता सोडणार
लातूर हादरलं ! कॉलेजमध्ये मैत्री, तरुणीला विश्वासात घेत लॉजवर नेले, शरीरसंबंधाच्या मागणीला नकार देताच केला भयंकर प्रकार
लातूर हादरलं ! कॉलेजमध्ये मैत्री, तरुणीला विश्वासात घेत लॉजवर नेले, शरीरसंबंधाच्या मागणीला नकार देताच केला भयंकर प्रकार
इंग्लंडने टी-20 मध्ये तब्बल तीनशेचा फेरा करून करूनही तिसऱ्या क्रमांकावर, पण पहिल्या दोन नंबरवर असणारे संघ कोणाच्या खिजगणतीमध्येही नाहीत!
इंग्लंडने टी-20 मध्ये तब्बल तीनशेचा फेरा करून करूनही तिसऱ्या क्रमांकावर, पण पहिल्या दोन नंबरवर असणारे संघ कोणाच्या खिजगणतीमध्येही नाहीत!
IND vs PAK Asia Cup: बर्थडे बाॅय सूर्यादादा पाकिस्तानविरुद्ध इतिहास रचू शकतो, आतापर्यंत जगातील फक्त 5 फलंदाजांनी पराक्रम केला!
बर्थडे बाॅय सूर्यादादा पाकिस्तानविरुद्ध इतिहास रचू शकतो, आतापर्यंत जगातील फक्त 5 फलंदाजांनी पराक्रम केला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal Protest: नेपाळ हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीद दर्जा; पीडितांना 10 लाखांची भरपाई, अंतरिम पंतप्रधान म्हणाले सहा महिन्यांत निवडणूक घेत सत्ता सोडणार
नेपाळ हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीद दर्जा; पीडितांना 10 लाखांची भरपाई, अंतरिम पंतप्रधान म्हणाले सहा महिन्यांत निवडणूक घेत सत्ता सोडणार
लातूर हादरलं ! कॉलेजमध्ये मैत्री, तरुणीला विश्वासात घेत लॉजवर नेले, शरीरसंबंधाच्या मागणीला नकार देताच केला भयंकर प्रकार
लातूर हादरलं ! कॉलेजमध्ये मैत्री, तरुणीला विश्वासात घेत लॉजवर नेले, शरीरसंबंधाच्या मागणीला नकार देताच केला भयंकर प्रकार
इंग्लंडने टी-20 मध्ये तब्बल तीनशेचा फेरा करून करूनही तिसऱ्या क्रमांकावर, पण पहिल्या दोन नंबरवर असणारे संघ कोणाच्या खिजगणतीमध्येही नाहीत!
इंग्लंडने टी-20 मध्ये तब्बल तीनशेचा फेरा करून करूनही तिसऱ्या क्रमांकावर, पण पहिल्या दोन नंबरवर असणारे संघ कोणाच्या खिजगणतीमध्येही नाहीत!
IND vs PAK Asia Cup: बर्थडे बाॅय सूर्यादादा पाकिस्तानविरुद्ध इतिहास रचू शकतो, आतापर्यंत जगातील फक्त 5 फलंदाजांनी पराक्रम केला!
बर्थडे बाॅय सूर्यादादा पाकिस्तानविरुद्ध इतिहास रचू शकतो, आतापर्यंत जगातील फक्त 5 फलंदाजांनी पराक्रम केला!
शॉकिंग ! ओबीसी आरक्षण अन् मुलींच्या नोकरीची चिंता असह्य, बीडमध्ये बापानं टोकाचं पाऊल उचललं
शॉकिंग ! ओबीसी आरक्षण अन् मुलींच्या नोकरीची चिंता असह्य, बीडमध्ये बापानं टोकाचं पाऊल उचललं
London March: आता लंडनमध्ये कोणतं आंदोलन पेटलं, तब्बल 1 लाख लोक एकटवले; थेट अमेरिकेतून अब्जाधीश उद्योजक एलाॅन मस्क सुद्धा सामील होत काय म्हणाले?
आता लंडनमध्ये कोणतं आंदोलन पेटलं, तब्बल 1 लाख लोक एकटवले, थेट अमेरिकेतून अब्जाधीश उद्योजक एलाॅन मस्क सुद्धा सामील होत काय म्हणाले?
Bacchu Kadu: मंत्रीमंडळात अर्ध्याहून अधिक मंत्री आका, फडणवीस मोठे आका, मोदी मणिपूरला गेले हा नेपाळचा परिणाम; बच्चू कडूंचा सडकून 'प्रहार'
मंत्रीमंडळात अर्ध्याहून अधिक मंत्री आका, फडणवीस मोठे आका, मोदी मणिपूरला गेले हा नेपाळचा परिणाम; बच्चू कडूंचा सडकून 'प्रहार'
मराठवाड्यात आभाळ फाटलं, 24 तासात 33 महसूल मंडळात अतिवृष्टी, गोदापात्रात प्रचंड विसर्ग, खरीप पिकांना मोठा तडाखा
मराठवाड्यात आभाळ फाटलं, 24 तासात 33 महसूल मंडळात अतिवृष्टी, गोदापात्रात प्रचंड विसर्ग, खरीप पिकांना मोठा तडाखा
Embed widget