एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंदापुरात दोन माजी आमदारांच्या सुना आमने-सामने
इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वालचंदनगर-कळस गटातून दोन माजी आमदारांच्या सुना एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवित आहेत.
यामध्ये इंदापूरचे माजी आमदार स्वर्गीय राजेंद्रकुमार घोलप यांच्या सुनबाई वंदनादेवी अविनाश घोलप या पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. माजी आमदार स्वर्गीय राजेंद्रकुमार घोलप हे 1980 ते 1985 पाच वर्षे आमदार होते.
वंदनादेवी यांच्याविरोधात 1985 ते 1995 अशी 10 वर्षे आमदार म्हणून राहिलेल्या माजी आमदार स्वर्गीय गणपतराव पाटील यांच्या सूनबाई वैशालीताई प्रतापराव पाटील या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत.
दोन्ही सुनबाई जिल्हा परिषदेत निवडून येण्यासाठी गटातील मतदारांना भेटत आहेत. मतदारांशी संवाद साधून जोरदार प्रचार करत आहेत. आपणच निवडून येणार असल्याचा दोन्ही सूनबाईंचा दावा आहे.
यामध्ये सूनबाई वैशालीताई प्रतापराव पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमधून, तर सुनबाई वंदनादेवी अविनाश घोलप या काँग्रेसमधून निवडणूक लढवत आहेत.
सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच इंदापूर तालुक्यात मात्र दोन माजी आमदारांच्या सूनबाईंची जोरात चर्चा आहे. मात्र, या राजकीय लढाईत यात कोण बाजी मारणार, याकडे साऱ्या इंदापूरवासियांचं लक्ष लागले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement