एक्स्प्लोर
बोटावरची शाई मिटेपर्यंत 15 टक्के सवलत, पुण्यातील हॉटेल क्लासमेटची योजना
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी पुण्याच्या कर्वेनगरमधील हॉटेल क्लासमेटनं मतदारांसाठी आकर्षक योजना आणली आहे. या हॉटेलनं मतदान करणाऱ्या पुणेकरांसाठी जेवणामध्ये तब्बल 15 टक्के सूट देण्याचं जाहीर केलं आहे. ही सूट मिळवण्यासाठी फक्त आपल्या बोटावर लावलेली शाई दाखवावी लागणार आहे.
पुणे महापालिकेतील 162 जागांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, तसंच लोकांनी बाहेरगावी न जाता पुण्यातच आपला प्लॅन करावा, यासाठी मतदानादिवशी जेवणाच्या बिलात 15 टक्के सूट जाहीर केली आहे. फक्त मतदानादिवशीच नाही, तर बोटावरील मतदानाची शाई निघेपर्यंत ही सूट देण्यात येणार आहे.
पुण्यातील कर्वेनगर चौकातील या हॉटेलमध्ये अस्सल वऱ्हाडी पदार्थ मिळतात. ग्राहकांनी या सवलतीचा लाभ उठवावा, असं आवाहन हॉटेलचे मालक मधुकरराव कुडकेलवार यांनी केलं आहे. तसंच गैरसोय टाळण्यासाठी ॲडव्हांस ऑर्डर दिल्यास आणखी चांगली सर्विस देता येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement