एक्स्प्लोर

15 August flag hoisting Pune : पुण्यात अजित पवार, चंद्रकांत पाटील नाही तर 'हे' करणार स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणावरुन राजकारण सुरु आहे. पुण्यातील ध्वजारोहण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे.

पुणे : यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) ध्वजारोहणावरुन राजकारण सुरु आहे. पुण्यातील ध्वजारोहण राज्यपाल रमेश बैस (Ramesh bais) यांच्या हस्ते होणार आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदावर अजित पवारांचा डोळा आहे. त्यामुळे पुण्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सरकारने ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आणि त्यानंतर ध्वजारोहणाचा तिढा सुटला होता. मात्र याच यादीवर हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि अजित पवारांनी नाराज व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुण्यात रमेश बैस ध्वजारोहण करतील, असं सांगण्यात आलं आहे. 

सध्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहे. त्यांना पुण्याच्या ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र अजित पवारांची नाराजी ओढवून घेणं परवडणारं नाही ही बाब भाजप आणि शिवसेनेला लक्षात आलं असावं.  त्यामुळे एक यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली त्यात चंद्रकांत पाटील यांना पुण्यात नाही तर रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान देण्य़ात आला. त्यामुळे पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

नाशिक जिल्ह्यात ध्वजारोहणाची संधी मिळावी अशी मंत्री छगन भुजबळांना इच्छा होती. हसन मुश्रीफ कोल्हापूर आणि अजित पवार पुणे जिल्ह्यात ध्वजारोहण करतील, अशी मागणी होती. मात्र ऐनवेळी आलेल्या यादीत वेगळे जिल्हे देण्यात आले होते. त्यावरुन अजित पवार किंवा बाकी नेते नाराज असल्याचं बोललं जात होतं. अजित पवार कोल्हापूरला ध्वजारोहणासाठी जाणार की मुंबईतच ध्वजारोहण करणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण

पुण्यात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7: 30 वाजता आणि शनिवार वाडा येथे सकाळी 8 वा. ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. तर  राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी 9:05मि. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.

कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यात करणार ध्वजारोहण?

देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे - पालघर

इतर महत्वाच्या बातम्या

Independence Day 2023 Special : हर घर तिरंगा रॅलीचं दिल्लीत आयोजन!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Embed widget