एक्स्प्लोर

बायोलॉजिकल फादर विचारतो, समाज स्वास्थ बिघडवणाऱ्या प्रशांत कोरटकरला फैलावर घेतलं, सरकारी वकिलांनी कोर्टात काय काय सांगितलं?

Prashant Koratkar : कोल्हापूरच्या कोर्टात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी पार पडत असून दोन्ही बाजूनी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. 

Prashant Koratkar : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या  (Prashant Koratkar) जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने गेल्या (दि. 30) सुनावणीत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये त्याची सध्या परवानगी करण्यात आली होती. यानंतर प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडत असून दोन्ही बाजूनी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. 

ऐक राजा ज्याने वयाच्या 16वर्षी लोककल्याण कारी कार्य केलं,  स्वराज्य निर्माण केलं. त्याच्याबद्दल अस वक्तव्य कशी होऊ शकतात. महाराजांचे बायोलॉजिकल फादर कोण असा प्रश्न आरोपी विचारतो. ही बाब खूप गंभीर आहे. अशा वक्तव्यामुळे समाज स्वास्थ बिघडू शकतं. अशी बाजू सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी मंडली असता तुम्ही पत्रकार आहे म्हणून सांगता, त्यावेळी तुम्ही जबाबदार व्यक्ती असलं पाहिजे,  असे म्हणत  सर्वोच्च न्यायालयाने  प्रशांत कोरटकरला खडे बोल सुनावले आहे. 

तपासासाठी घेण्यासारखं काही राहिलेलं नाही, त्यामुळं जामीन मिळावा- सौरभ घाग

आरोपीला ज्यांनी ज्यांनी मदत केल्याचं प्रशांत कोरटकर सांगतो, त्यातील सर्वांना चौकशीसाठी नोटीस दिल्या, पण काही जण चौकशीसाठी आजुन ही हजर झाले नाहीत. मग त्यांचा हेतू काय? याचा ही तपास करावा लागेल,  असे मत सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी नोंदवले आहे. तर यावर बोलताना कोरटकर वकील सौरभ घाग यांनी उत्तर देत सांगितलं की, रात्री फोन येतो आणि त्यातील संभाषण व्हायरल करतो, हे खूप गंभीर आहे. शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय म्हटलं हे नागरिकांना कळायला हवं, असा पोस्टमध्ये उल्लेख आहे.

कोरटकर यांनी तातडीने आपली बाजू नागपूर पोलिसांकडे मांडली. धमक्या येत आहेत हे देखील पोलिसांना सांगितलं. आम्ही पोलिसांना सहकार्य करू, असे सांगितले होते. तरी देखील जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. अटक करण्यासाठी पोलीस आणि तक्रारदार यांचा हेतू काय आहे? असा प्रतिप्रश्न सौरभ घाग यांनी यावेळी केलाय. आवाजाचे नमुने घेतले आहेत, तपासासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी रिकव्हर केल्या आहेत. आता तपासासाठी घेण्यासारखं काही राहिलेलं नाही, त्यामुळं जामीन मिळावा असेही सौरभ घाग यावेळी म्हणाले आहे. 

आरोपीला मराठा-ब्राम्हण समाजात तेढ निर्माण करायची होती- सरकारी वकील

आरोपी स्वतःला पत्रकार आहे म्हणून सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक माहितीपट तयार केला आहे, असं देखील तो म्हणतो. मग शिवाजी महाराज, संभाजी महाराज यंच्याबद्दल त्याचे विचार घृणास्पद कसे? आरोपीला मराठा आणि ब्राम्हण समाजात तेढ निर्माण करायची आहे. तर तक्रारदार हे इतिहास संशोधक आहेत. आरोपीने सुरुवातीला मी कॉल केला नाही असं म्हटलं. मात्र हा तांत्रिक बाबीचा आधार घेण्याचा अपयश ठरलेला प्रयत्न आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात कोरटकर याने त्याच्याच मोबाईलवरून फोन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मोबाईल हॅक झाला हा आरोपीचा दावा खोटा ठरतो. असे मत ही सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी कोर्टात मांडलं आहे. 

इंद्रजीत सावंत यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही- सूर्यकांत पवार 

आरोपीने ज्यांची नाव सांगितले आहेत त्यांची अजून चौकशी झालेली नाही. या प्रकरणाचा संपूर्ण तपास अद्याप संपलेला नाही. त्याने मदत केलेली नाव सांगितली, पण अशा सर्वांना सामोरा समोर बसवून आजुन चौकशी झाली नाही. यात शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ साहेबांबद्दल  हेतू पूर्वक बदनामी केली आहे. याशिवाय याचा कोणताही वेगळा अर्थ नाही. ब्राह्मण समाजाचं वर्चस्व हेच या आरोपीच्या हेतूचा हा ऐक भाग आहे. तक्रारदार इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल आहे, असं न्यायालयासमोर खोटं सांगण्यात आलं आहे. सावंत यांच्यावर अद्याप एकही गुन्हा नाही ही बाब न्यायालयाने लक्षात घ्यावी. 

आरोपीने कोर्टाचे देखील फसवणूक केलीय 

सुरुवातीला धमकी देताना हे आमचं सरकार आहे, हे लक्षात घ्या अशी धमकी दिली आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला तर आरोपी काहीही करू शकतो. आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हे देखील कोर्टाने लक्षात घ्यायला हवं. आम्ही नेहमी सांगत आहे सावंत यांचा कोणता व्हिडिओ आरोपी यांनी पाहिला ज्याच्यामुळे त्याचा राग अनावर झाला. पण त्याबाबत आरोपी किंवा त्याचे वकील उत्तर देत नाहीत.

सुरुवातीच्या काळात कोर्टाकडे जी कागदपत्र सादर केली त्यामध्ये वेगवेगळ्या सह्या आढळून येतात, त्यामुळे आरोपीने कोर्टाचे देखील फसवणूक केली आहे. त्यामुळे केवळ लावलेली कलमं आणि त्याला असलेली शिक्षा यावर चर्चा करून जामीन मंजूर करू नये. ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याबद्दल इंद्रजीत सावंत यांच्यावर आरोपीच्या वकिलांनी आरोप केले आहेत, त्याबद्दल देखील माफी मागितली पाहिजे. असेही सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी कोर्टात मांडलं आहे.

हे ही वाचा 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget