एक्स्प्लोर

Airports in India : सावधान! विमानाने प्रवास करताना पाॅवर बँक घेऊन जाणे पडेल महागात, होऊ शकते जप्तीची कारवाई

देशभरातील विविध विमानतळांवर दररोज सुमारे 25,000 प्रतिबंधित वस्तू जप्त केल्या जातात. त्यात सर्वाधिक संख्याही पाॅवर बँकेची आहे.

Airports in India : सध्याच्या काळात इलेक्ट्राॅनिक साधनांशिवाय कोणाचे पान देखील हालत नाही. प्रत्येक ठिकाणी जाताना  लोक  इलेक्ट्राॅनिक साहित्य सोबत ठेवतात. अनेकदा लोक प्रवास करताना मोबाईल चार्ज करण्याकरता आपल्या सोबत पाॅवर बँक ठेवतात. मात्र तुम्ही जर विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या चांगलीच कामी पडणार आहे. विमानतळांवर अनेक गोष्टी या जप्त केल्या जातात. मात्र या जप्त केलेल्या वस्तूंच्या यादीत पाॅवर बॅक पहिल्या स्थानावर आहे. 

ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने (बीसीएएस) सोमवारी सांगितले की, देशभरातील विविध विमानतळांवर दररोज सुमारे 25,000 प्रतिबंधित वस्तू जप्त केल्या जातात. ब्युरोचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी दिल्लीतील BCAS मुख्यालयात विमान वाहतूक सुरक्षा संस्कृती सप्ताह-2023 चे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, "आम्ही देशातील सर्व विमानतळांवर दररोज सुमारे आठ लाख हँडबॅग आणि पाच लाख चेक इन बॅगेज तपासतो. तपासणी करत असताना, आम्हाला सुमारे 25,000 प्रतिबंधित वस्तू सापडतात. ज्यामुळे सुरक्षा कर्मचार्‍यांचा वेळ वाया जातो. याचा परिणाम विमानतळाच्या सुरक्षेवरही होत आहे."

सर्वाधिक पॉवर बँका जप्त केल्या आहेत

BCAS ने सांगितले की चेक-इन बॅगेजमध्ये जप्त केलेल्या प्रतिबंधित वस्तू बहुतेक वेळा पॉवर बँक (44 टक्के), लाइटर (19 टक्के),  बॅटरी (18 टक्के) आणि लॅपटॉप (11 टक्के) आहेत. लाइटर (26 टक्के), कात्री (22 टक्के), चाकू (16 टक्के) इतक्या गोष्टी आजवर जप्त करण्यात आल्या आहेत.

हसन म्हणाले की, "आम्ही एकाही चुकीकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक आठवडाभराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. भारतात विमानाने पहिल्यांदा प्रवास करणाऱ्यांची संख्या संपूर्ण जगात जास्त आहे. त्यांनी सांगितले की, एका दिवसात  4.8 लाख प्रवासी 3300 फ्लाइट्समधून प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व गोष्टींवर काम करत आहोत. प्रवाशांसोबतच सुरक्षेसोबतच आम्ही विमानतळाच्या लँडसाईड भागातील लोकांच्या सुरक्षेचीही काळजी घेत आहोत."

पॉवर बँक ठेवण्याचा नियम काय आहे?

पॉवर बँकांमध्ये लिथियम-आयन बॅटरी असतात, ज्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने धोकादायक मानल्या आहेत. लिथियम आयन बॅटरी योग्यरित्या हाताळल्या नसल्यास स्फोट होण्याचा धोका असतो.100Wh (वॅट-तास) पेक्षा कमी क्षमतेच्या पॉवर बँका केबिन बॅगेजमध्ये ठेवल्या जाऊ शकतात. 100Wh आणि 160Wh दरम्यान क्षमतेच्या पॉवर बँक्स नेण्यासाठी एअरलाइनची परवानगी आवश्यक आहे. 160Wh पेक्षा जास्त क्षमतेच्या पॉवर बँकांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget